Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 24

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- वसिष्ठो मैत्रावरुणिः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
अ꣢ग्ने꣣ र꣡क्षा꣢ णो꣣ अ꣡ꣳह꣢सः꣣ प्र꣡ति꣢ स्म देव रीष꣣तः꣢ । त꣡पि꣢ष्ठैर꣣ज꣡रो꣢ दह ॥२४॥

अ꣡ग्ने꣢꣯ । र꣡क्ष꣢꣯ । नः꣣ । अँ꣡ह꣢꣯सः । प्र꣡ति꣢꣯ । स्म꣣ । देव । रीषतः꣢ । त꣡पि꣢꣯ष्ठैः । अ꣣ज꣡रः꣢ । अ꣣ । ज꣡रः꣢꣯ । द꣣ह ॥२४॥

Mantra without Swara
अग्ने रक्षा णो अꣳहसः प्रति स्म देव रीषतः । तपिष्ठैरजरो दह ॥

अग्ने । रक्ष । नः । अँहसः । प्रति । स्म । देव । रीषतः । तपिष्ठैः । अजरः । अ । जरः । दह ॥२४॥

Samveda - Mantra Number : 24
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (अग्ने) ज्योतिष्मन् परमात्मन् आपण (न:) आमचे (अहस:) पापाचरणापासून (रक्ष) रक्षण करा. हे (देव) दिव्य गुण, कर्म, स्वभावधारक, सकलैश्वर्मदाता, प्रकाशमान, सर्वप्रकाशक जगदीश्वर आपण (अजर:) नश्वरत्व आणि जर्जरत्वापासून रहित आहात. आपण आम्हा उपासकांच्या (रिषत:) हिंसापरायण आंतरिक व बाह्य शत्रूंना आपल्या (तपिष्ठै:) अतिशय संतापक अशा स्वकीय सामर्थ्याने (प्रति दहस्म) भस्म रून टाका. ।।४।।
Essence
ज्याप्रमाणे अग्नी थंडीपासून, अंधकार आणि व्याघ्रादी प्राण्यापासून माणसाचे रक्षण करतो, जसा एक राजा पापीजनांना दंडित करून आक्रमणकारी अन्यायीजनांचा व शत्रूचा पराभव करून प्रजेची पापाचरणापासून व शत्रूपासून रक्षा करतो. त्याप्रमाणे परमेश्वर आम्हाला आत्मरक्षेसाठी सामर्थ्य प्रदान करो. पापाचरण आणि आंतरिक बाह्य शत्रूपासून आमची रक्षा करो, अशी प्रार्थना इथे केली आहे. ।।४।।
Subject
पुढील मंत्रात पापापासून रक्षणासाठी परमेश्वराची प्रार्थना केली आहे.
Special
श्लेषाद्वारे या मंत्रशची भौतिक अग्नीच्या तसेच राजाच्या पक्षी अर्थ योजना केली पाहिजे. ।।४।।