Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 233

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वसिष्ठो मैत्रावरुणिः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
अ꣣भि꣡ त्वा꣢ शूर नोनु꣣मो꣡ऽदु꣢ग्धा इव धे꣣न꣡वः꣢ । ई꣡शा꣢नम꣣स्य꣡ जग꣢꣯तः स्व꣣र्दृ꣢श꣣मी꣡शा꣢नमिन्द्र त꣣स्थु꣡षः꣢ ॥२३३॥

अ꣣भि꣢ । त्वा꣣ । शूर । नोनुमः । अ꣡दु꣢ग्धाः । अ । दु꣣ग्धाः । इव । धेन꣡वः꣢ । ई꣡शा꣢꣯नम् । अ꣣स्य꣢ । ज꣡ग꣢꣯तः । स्व꣣र्दृ꣡श꣢म् । स्वः꣣ । दृ꣡श꣢꣯म् । ई꣡शा꣢꣯नम् । इ꣣न्द्र । तस्थु꣡षः꣢ ॥२३३॥

Mantra without Swara
अभि त्वा शूर नोनुमोऽदुग्धा इव धेनवः । ईशानमस्य जगतः स्वर्दृशमीशानमिन्द्र तस्थुषः ॥

अभि । त्वा । शूर । नोनुमः । अदुग्धाः । अ । दुग्धाः । इव । धेनवः । ईशानम् । अस्य । जगतः । स्वर्दृशम् । स्वः । दृशम् । ईशानम् । इन्द्र । तस्थुषः ॥२३३॥

Samveda - Mantra Number : 233
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (शूर) विक्रमशील (इन्द्र) परमेश्वर, (अस्य) हे जे सर्व समोर दिसत आहे, त्या (जगतः) गमनशील, चल पदार्थांचे (ईशानम्) तुम्हीच अधीश्वर आहात आणि (तस्युषः) अचल वा स्थावर जगाचेही तुम्हीच (ईशानम्) स्वामी आहात. (स्वर्हशम्) मोक्ष- सुखाचे दर्शन घडविणाऱ्या अशा (त्वा अभि) तुम्हाला उद्देशून आम्ही वारंवार तुमची स्तुती करीत आहोत. आम्ही उपासक / प्रजाजन (अदुग्धाः धेनवः इव) ज्यांचे अजून दोहन केले नाही, (त्यामुळे ज्या आपल्या वासराला दूध पाजविण्यासाठी आतुर आहेत) अशा गायी ज्याप्रमाणे वासराला दूध पाजविण्यासाठी हंबरतात, तसे आम्ही उपासक तुमचे अत्यंत स्तुतिगान करीत आहोत. तुम्ही आम्हाला तसेच प्रिय आहात, जे गायीला तिचे वासरू प्रिय असते. या उपमेवरून हाच ध्वन्यर्थ व्यक्त होत आहे.।।१।।
Essence
ज्याप्रमाणे गायी वासराला दूध पाजवून स्वतः सुख प्राप्त करतात, तद्वत मनुष्यांनी परमेश्वराशी प्रीति जोडा आणि त्याद्वारे अभ्युदय व निःश्रेयस दोन्हींचे सुख प्राप्त करावे.।।१।।
Subject
परमेश्वराचे गुणवर्णन, स्तुती
Special
या मंत्रात उपमा अलंकार आहे.।।१।।