Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 232

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- श्रुतकक्ष आङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
ए꣣वा꣡ ह्यसि꣢꣯ वीर꣣यु꣢रे꣣वा꣡ शूर꣢꣯ उ꣣त꣢ स्थि꣣रः꣢ । ए꣣वा꣢ ते꣣ रा꣢ध्यं꣣ म꣡नः꣢ ॥२३२॥

ए꣣व꣢ । हि । अ꣡सि꣢꣯ । वी꣣रयुः꣢ । ए꣣व꣢ । शू꣣रः꣢ । उ꣣त꣢ । स्थि꣣रः꣢ । ए꣣व꣢ । ते꣣ । रा꣡ध्य꣢꣯म् । म꣡नः꣢꣯ ॥२३२॥

Mantra without Swara
एवा ह्यसि वीरयुरेवा शूर उत स्थिरः । एवा ते राध्यं मनः ॥

एव । हि । असि । वीरयुः । एव । शूरः । उत । स्थिरः । एव । ते । राध्यम् । मनः ॥२३२॥

Samveda - Mantra Number : 232
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 1; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 12;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे इन्द्र परमेश्वर अथवा हे राजा, (एव हि) खरोखर आपण (वीरयुः) वीरांना चाहणारे वा त्यावर स्नेह करणारे (असि) आहात. (एव) खरोखर आपण (शूरः) शूरवीर (उत) आणि (स्थिरः) अविचल वा दृढ आहात. (एव) खरोखरच (ते) तुमचे (मनः) मन (राध्यम्) सत्कर्मांद्वारे अनुकूल केले जाणे शक्य आहे. (कारण तुम्ही सदाचारी व सत्कर्मी व्यक्तीवर अनुग्रह करता.) ।। १०।।
Essence
जसे परमेश्वर स्वतः वीर, सुस्थिर आणि अनविजेय आहे व तो वीरांची कामना करणारा आहे, तो भीरू लोकांना चाहत नाही. राजानेही परमेश्वराप्रमाणे असावे.।।१०।।
या दशतीमध्ये सोमपानासाटी निमंत्रण, परमेश्वराचे सख्यत्व व त्याचे महत्त्व, त्याच्यापासून बल प्राप्तीची कामना, शूर रूपाने त्याची स्तुती, इंद्र शब्दाने आचार्य, राजा आदींच्या चरित्राचे वर्णन, हे सर्व विषय आले आहेत. यामुळे या मंत्रांच्या अर्थाशी मागील अध्यायाच्या मंत्रांची संगती आहे, असे जाणावे.।।
तृतीय प्रपाठकातील प्रथम अर्धाची चतुर्थ दशति समाप्त.
द्वितीय अध्यायातील बारावा खंड समाप्त.
इथे द्वितीय अध्याय संपला.
Subject
परमेश्वराची व राजाची स्तुती
Special
या मंत्रात अर्थश्लेषालंकार आहे.।। १०।।