Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 227

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- मेधातिथिः काण्वः प्रियमेधश्चाङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
आ꣢ या꣣ह्यु꣡प꣢ नः सु꣣तं꣡ वाजे꣢꣯भि꣣र्मा꣡ हृ꣢णीयथाः । म꣣हा꣡ꣳ इ꣣व꣢ यु꣡व꣢जानिः ॥२२७॥

आ꣢ । या꣣हि । उ꣡प꣢꣯ । नः꣣ । सुत꣢म् । वा꣡जे꣢꣯भिः । मा । हृ꣣णीयथाः । महा꣢न् । इ꣣व । यु꣡व꣢꣯जानिः । यु꣡व꣢꣯ । जा꣣निः ॥२२७॥

Mantra without Swara
आ याह्युप नः सुतं वाजेभिर्मा हृणीयथाः । महाꣳ इव युवजानिः ॥

आ । याहि । उप । नः । सुतम् । वाजेभिः । मा । हृणीयथाः । महान् । इव । युवजानिः । युव । जानिः ॥२२७॥

Samveda - Mantra Number : 227
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 1; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 12;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे इन्द्र परमात्मा, आपण आम्हाला (वाजभिः) आत्मिक बल आणि योगैश्वर्य रूप उपहार देणारे आहात. आपण (नः) आम्ही आरंभ केलेल्या उपासना यज्ञामध्ये (आ याहि) या (मा हृणी यथाः) कोणत्या प्रकारेही आमच्यावर रोष व संकोच करू नका. (इव) ज्याप्रमाणे (युवजानिः) युवती पत्नीचा (महान्) महान गुणवान कोणी एक पती बहुमूल्य उपहार घेऊन पत्नीसह दुसऱ्यांच्या यज्ञ- समारंभात जातो (तसे तुम्हीही आमच्यासाठी आत्मिक बल व भौतिक ऐश्वर्य घेऊन या.)।।५।।
Essence
ज्याप्रमाणे रूपवती भार्याचा पती कोणी मोठा प्रतिष्ठित माणूस सामान्यजनांचे निमंत्रण स्वीकारून काही उपहार घेऊन यज्ञ- कार्यक्रमात पत्नीसह जातो, तसेच तो महान परमात्मा आम्हा तुच्छ उपासकांच्या उपासना- यज्ञात आध्यात्मिक उपहार घेऊन यावे (अशी आम्ही कामना करीत आहोत.)।।५।।
Subject
परमेश्वराला उपासना यज्ञाकरिता आवाहन
Special
या मंत्रात उपमा अलंकार आहे.।।५।।