Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 22

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- भरद्वाजो बार्हस्पत्यः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
अ꣣ग्नि꣢स्ति꣣ग्मे꣡न꣢ शो꣣चि꣢षा꣣ य꣢ꣳ स꣣द्वि꣢श्वं꣣ न्या꣢३꣱त्रि꣡ण꣢म् । अ꣣ग्नि꣡र्नो꣢ वꣳसते र꣣यि꣢म् ॥२२॥

अ꣣ग्निः꣢ । ति꣣ग्मे꣡न꣢ । शो꣣चि꣡षा꣢ । यँ꣡ऽस꣢꣯त् । वि꣡श्व꣢꣯म् । नि । अ꣣त्रि꣡ण꣢म् । अ꣣ग्निः꣢ । नः꣣ । वँऽसते । र꣣यि꣢म् ॥२२॥

Mantra without Swara
अग्निस्तिग्मेन शोचिषा यꣳ सद्विश्वं न्या३त्रिणम् । अग्निर्नो वꣳसते रयिम् ॥

अग्निः । तिग्मेन । शोचिषा । यँऽसत् । विश्वम् । नि । अत्रिणम् । अग्निः । नः । वँऽसते । रयिम् ॥२२॥

Samveda - Mantra Number : 22
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(अग्नि:) तेजोमय परमेश्वराने (तिग्नेत) आपल्या तीक्ष्ण अशा (शोचिषा) तेजाद्वारे (विश्वम्) समस्त (अत्रिणम्) भक्षक काम क्रधोदी आंतरिक शत्रुदळाला तसेच चोर, दरोडेखोर अशा बाह्य शत्रूंना (नियंसत्) नियंत्रित करावे. (अशी आमची प्रार्थना.) तसेच (अग्नि:) त्या अग्निपदवाच्य परमात्म्याने (न:) आमच्यासाठी (रयिम्) सोने, चांदी, प्रजा-पशु आदी भौतिक धन तसेच सत्य, अहिंसा आदी आध्यात्मिक धन (वंसते) वाटून विभागून द्यावे, ही प्रार्थना. ।।२।।
Essence
ज्याप्रमाणे भौतिक अग्नी अथवा विद्युत आपल्या तेजाने जवळ असलेल्या पदार्थाला जाळून टाकतात अथवा त्यांचा शिल्प, यंत्रादी कामात वापर केल्यास ऐश्वर्य प्रदान करतात, तद्वत परमात्मरूप अग्नी उपासकांच्या आंतरिक व बाह्य शत्रूंचा निग्रह करतो. तसेच उपासकांची सांसारिक व आध्यात्मिक संपत्ती वृद्धिंगत करतो. ।।२।।
Subject
परमेश्वर स्तोताला कोणकोणती फळे प्रदान करतो, हे सांगतात. -
Special
श्लेष अलंकाराने या मंत्राची अग्नीपरक अर्थयोजनादेखील करता येते. ।।२।।