Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 217

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- मेधातिथिः काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
बृ꣣ब꣡दु꣢क्थꣳ हवामहे सृ꣣प्र꣡क꣢रस्नमू꣣त꣡ये꣢ । सा꣡धः꣢ कृ꣣ण्व꣢न्त꣣म꣡व꣢से ॥२१७॥

बृ꣣ब꣡दु꣢क्थम् । बृ꣣ब꣢त् । उ꣣क्थम् । हवामहे । सृप्र꣡क꣢रस्नम् । सृ꣣प्र꣢ । क꣣रस्नम् । ऊत꣡ये꣢ । सा꣡धः꣢꣯ । कृ꣣ण्व꣡न्त꣢म् । अ꣡व꣢꣯से ॥२१७॥

Mantra without Swara
बृबदुक्थꣳ हवामहे सृप्रकरस्नमूतये । साधः कृण्वन्तमवसे ॥

बृबदुक्थम् । बृबत् । उक्थम् । हवामहे । सृप्रकरस्नम् । सृप्र । करस्नम् । ऊतये । साधः । कृण्वन्तम् । अवसे ॥२१७॥

Samveda - Mantra Number : 217
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 1; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 11;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(प्रथम अर्थ) (परमात्म पर) - आम्ही (उपासक) (बृबदुक्थम्) प्रशंसनीय, कीर्तिवान, (सुप्रक र स्नम्) आणि व्यापक महान कर्म करण्यात निष्णात तसेच (अवसे) उन्नतीसाठी (साधः) जो आमच्यासाठी सूर्य, वायू, अग्नी, चांदी, स्वर्ण आदी साधने (कृष्णन्तम्) उत्पन्न करतो, त्या इन्द्र नाम परमेश्वराला (ऊतये) आमच्या सुरक्षेसाठी (हवामहे) बोलावतो, हाक मारतो।।
द्वितीय अर्थ - (राजापर) - आम्ही प्रजाजन (बृबदुक्थम्) प्रशंसनीय व कीर्तिमान (सुप्रकरस्नम्) राजाला की ज्याचे बाहू गुडघ्यापर्यंत लांब आहे (आजानुबाहू) अथवा शत्रुनिग्रह कार्यात, प्रजापालन आदी कार्यात ज्याचे हात (शासन- व्यवस्था) दूर दूरपर्यंत गेलेली आहे, तसेच जो (अवसे) प्रण्वन्तम्) प्रजेच्या उत्कर्षाकरिता जो राजा (साधः) शस्त्रास्त्र निर्मिती, ज्ञान-विज्ञान, आरोग्य पालन आदींची (कृण्वन्तम्) जो उत्पादन करतो, त्या इंद्र राजाला आम्ही प्रजाजन (ऊतये) आपल्या रक्षणासाठी (हवामहे) आवाहन करतो.।। ४।।
Essence
पुरुषार्थीजन सर्वशक्तिमान परमेश्वराच्या आणि सुयोग्य राजाच्या साह्यानेच स्वतःची व समाजाची प्रगती घडवू शकतात. म्हणून सर्व उपासकांनी / प्रजाजनांनी त्यांचेच साह्य मागावे.।।४।।
Subject
परमेश्वराला आणि राजाला आवाहन - रक्षणासाठी