Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 212

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वामदेवो गौतमः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
इ꣣मे꣡ त꣢ इन्द्र꣣ सो꣡माः꣢ सु꣣ता꣢सो꣣ ये꣢ च꣣ सो꣡त्वाः꣢ । ते꣡षां꣢ मत्स्व प्रभूवसो ॥२१२

इ꣣मे꣢ । ते꣣ । इन्द्र । सो꣡माः꣢꣯ । सु꣣ता꣡सः꣢ । ये । च꣣ । सो꣡त्वाः꣢꣯ । ते꣡षा꣢꣯म् । म꣣त्स्व । प्रभूवसो । प्रभु । वसो ॥२१२॥

Mantra without Swara
इमे त इन्द्र सोमाः सुतासो ये च सोत्वाः । तेषां मत्स्व प्रभूवसो ॥२१२

इमे । ते । इन्द्र । सोमाः । सुतासः । ये । च । सोत्वाः । तेषाम् । मत्स्व । प्रभूवसो । प्रभु । वसो ॥२१२॥

Samveda - Mantra Number : 212
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 10;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
प्रथम अर्थ - (परमात्मपर अर्थ) हे (इन्द्र) परमेश्वर, (ते) तुमच्याकरिता (इमे) आम्ही वर्तमानकाळी प्रस्तुत करीत असलेला जो (सोमाः मैत्रीपूर्ण रस (भक्तीभावात रंगलेले ध्यान) आहे आणि (ये) जे (सुतासः) भूतकाळी निष्पादित (भक्ति वा उपासनारूप रस) आहेत, ते व तसे भाव (सोत्वाःच) भविष्यकाळीदेखील निष्पादित होत राहतील (आम्ही तुमची भक्ती करती आलो आहोत, करीत आहोत व पुढेही करीत राहू.) हे (प्रभूवसो) आमच्या हृदयात सद्गुणांची स्थापना करणआऱ्या हे परमेश्वरा, तू (तेषाम्) त्या आनंद रसाने (मत्स्व) प्रभुदित व्हा।।
द्वितीय अर्थ - (जीवात्मा पक्षी) - हे (इन्द्र) जीवात्मा, (ते) तुझ्यासाठी (इमे) हे वर्तमानकाळी आम्ही प्रस्तुत करीत असेले (ये) जे (सोमाः) ज्ञानरस, कर्मरस व श्रद्धारस आहेत, तसेच (सुतासः) पूर्वी भूतकाळी व्यक्त केलेले जे रस आहेत (सोत्वाःच) ते भविष्यकाळीदेखील व्यक्त होत राहतील. हे (प्रभूवसो) मन, बुद्धी, इंद्रिये आदींना अत्यधिक स्थिर वा शांत करणाऱ्या जीवात्मा, (तेषाम्) त्या रसाद्वारे तू (भत्स्व) तृप्त होत म्हणजे अधिक ज्ञानवान, अधिक कर्मण्य आणि श्रद्धावान हो।। ९।।
Essence
सर्वांचे कर्तव्य आहे की उपासकांच्या मनात सद्गुणांची स्थापना करणाऱ्या आणि दिव्य संपदेचा जो स्वामी त्या परमेश्वराला सदा सर्वकाळी मैत्री रसाने तृप्त करावे (त्याला आपला सर्वश्रेष्ठ मित्र मानावे) आणि आपल्या आत्म्यास ज्ञानरस, कर्मरस व श्रद्धारसाने तृप्त करावे.।। ९।।
Subject
सोम रसपान करण्यासाठी इन्द्राला निमंत्रण
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे.।। ९।।