Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 21

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- प्रयोगो भार्गवः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
अ꣣ग्निं꣡ वो꣢ वृ꣣ध꣡न्त꣢मध्व꣣रा꣡णां꣢ पुरू꣣त꣡म꣢म् । अ꣢च्छा꣣ न꣢प्त्रे꣣ स꣡ह꣢स्वते ॥२१॥

अ꣣ग्नि꣢म् । वः꣣ । वृध꣡न्त꣢म् । अ꣣ध्वरा꣡णा꣢म् । पु꣣रूत꣡म꣢म् । अ꣡च्छ꣢꣯ । न꣡प्त्रे꣢꣯ । स꣡ह꣢꣯स्वते ॥२१॥

Mantra without Swara
अग्निं वो वृधन्तमध्वराणां पुरूतमम् । अच्छा नप्त्रे सहस्वते ॥

अग्निम् । वः । वृधन्तम् । अध्वराणाम् । पुरूतमम् । अच्छ । नप्त्रे । सहस्वते ॥२१॥

Samveda - Mantra Number : 21
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे मनुष्यांनो, (व:) तुम्ही (सहस्वते) प्रशस्त शक्तीयुक्त तसेच (नप्त्रे) पतनाकडे न जाणारी अथवा मनुष्याला पतनाकडे न नेणारी संतती प्राप्त करण्यासाठी आणि सद्गुणरूप दिव्य संतान प्राप्तीसाठी (वृधन्तम्) वृद्धी करणाऱ्या उन्नती, प्रगती देणाऱ्या आणि (अध्वयणाम्) अग्निहोत्र आदीपासून ते अश्वमेध यज्ञापर्यंत हिंसारहित कर्मकांडमय यज्ञांचे पूरक अथवा स्तुती, प्रार्थना, उपासना, स्वाध्याय, ब्रह्मयज्ञ आदी ज्ञानयज्ञांचे (पुरूतमम्) अत्यंत पूरक (अग्निम्) तेजोमय, अग्रणी, परमात्म्याचे (अच्छ) समोर उपस्थित व्हा म्हणजे त्याची आराधना करा. ।।१।।
Essence
परमेश्वर उपासकांची उन्नती घडवून आणतो. तो उपासकांनी केलेले ज्ञानयज्ञ, भक्तियज्ञ आणि कर्मयज्ञ संपूर्णत्वास नेतो आणि त्यांना सुसंतान आणि सद्गुण प्रदान करतो. ।।१।।
Subject
प्रथम मंत्रात लोकांना परमात्म अग्नीच्या उपासनेविषयी प्रेरणा केली आहे. -