Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 205

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- मधुच्छन्दा वैश्वामित्रः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
अ꣡सृ꣢ग्रमिन्द्र ते꣣ गि꣢रः꣣ प्र꣢ति꣣ त्वा꣡मुद꣢꣯हासत । स꣣जो꣡षा꣢ वृष꣣भं꣡ पति꣢꣯म् ॥२०५॥

अ꣡सृ꣢꣯ग्रम् । इ꣣न्द्र । ते । गि꣡रः꣢꣯ । प्र꣡ति꣢꣯ । त्वाम् । उत् । अ꣣हासत । सजो꣡षाः꣢ । स꣣ । जो꣡षाः꣢꣯ । वृ꣣षभ꣢म् । प꣡ति꣢꣯म् ॥२०५॥

Mantra without Swara
असृग्रमिन्द्र ते गिरः प्रति त्वामुदहासत । सजोषा वृषभं पतिम् ॥

असृग्रम् । इन्द्र । ते । गिरः । प्रति । त्वाम् । उत् । अहासत । सजोषाः । स । जोषाः । वृषभम् । पतिम् ॥२०५॥

Samveda - Mantra Number : 205
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 10;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (इन्द्र) पूजनीय जगदीश्वरा, मी (ते) तुझी स्तुती करण्यासाठी (गिरः) वेदवाणी (असृग्रम्) उच्चारित करीत आहे. (सजोषाः) गहन प्रेमाने उच्चारित केलेली ही वेदवाणी (वृषभम्) सर्व अभीष्ट पदार्थांची वृष्टी करणाऱ्या (पतिम्) पालनकर्ता (त्वां प्रति) आपणाला उद्देशून (उद् अहासत) (माझ्या हृदयातून) उठत आहे आणि तुला प्राप्त करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे.।। २।।
Essence
जर उपासकाने वेदवाणीद्वारे अत्यंत प्रेमाने ईश्वराची स्तुती केली, तर तो अवश्य प्रसन्न होतो आणि स्तोतासाठी तो धर्म, अर्थ, काम, मोक्ष (या चार पुरुषार्थांची) वृष्टी करतो।। २।।
Subject
पुढील मंत्रात परमेश्वराच्या स्तुतिविषयी सांगितले आहे -
Special
एक प्रीतिमयी भार्या ज्याप्रमाणे आपल्या पोषक प्रिय पतीला प्राप्त करण्यासाठी त्याच्याकडे जाते, तद्वत माझी (उपासकाची) स्तुती तुझ्यापर्यंत जाते. या मंत्रातील उपमा अलंकारामुळे हा ध्वनी व्यक्त होत आहे.।। २।।