Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 202

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- भरद्वाजो बार्हस्पत्यः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
इ꣢न्द्रा꣣ नु꣢ पू꣣ष꣡णा꣢ व꣣य꣢ꣳ स꣣ख्या꣡य꣢ स्व꣣स्त꣡ये꣢ । हु꣣वे꣢म꣣ वा꣡ज꣢सातये ॥२०२॥

इ꣡न्द्रा꣢꣯ । नु । पू꣣ष꣡णा꣢ । व꣣य꣢म् । स꣣ख्या꣡य꣢ । स꣣ । ख्या꣡य꣢꣯ । स्व꣣स्त꣡ये꣢ । सु꣣ । अस्त꣡ये꣢ । हु꣣वे꣡म꣢ । वा꣡ज꣢꣯सातये । वा꣡ज꣢꣯ । सा꣣तये ॥२०२॥

Mantra without Swara
इन्द्रा नु पूषणा वयꣳ सख्याय स्वस्तये । हुवेम वाजसातये ॥

इन्द्रा । नु । पूषणा । वयम् । सख्याय । स । ख्याय । स्वस्तये । सु । अस्तये । हुवेम । वाजसातये । वाज । सातये ॥२०२॥

Samveda - Mantra Number : 202
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 1; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 9;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(वयम्) आम्ही प्रजाजनांनी (सख्याय) मैत्रीसाठी तसेच (स्वस्तये) अविनाशी, उत्तम दशा व कल्याणासाठी (इन्द्रा पूषणा) परमात्मा - जीवात्मा, प्राण- अपान, राजा- सेनापती, क्षत्रिय वैश्य आणि विद्युत वायू या सर्वांना (योग्य व आवश्यक त्या त्या वेळी) (नु) अवश्यमेव हाक मारावी (व यांचे साहाय्य घ्यावे) तसेच (वाजसातये) अन्न, धन, शक्ती, वेग, विज्ञान, प्राणशक्ती आणि आत्मशक्ती प्राप्त करविणाऱ्या आंतरिक व बाह्य संग्रामामध्ये यशस्वी होण्याकरिता वर उल्लेखिलेल्या सर्वांना हाक मारावी व त्यांचे साहाय्य घ्यावे (हेच आमच्या हिताचे आहे.) ।। ९।।
Essence
मानवीय जीवनात प्रत्येकाच्या मनात व बाह्य परिस्थितीत सतत युद्ध वा संघर्ष सुरू असतो. त्या संघर्षात जे लोक परमात्मा, जीवात्मा, प्राण, अपान, राजा, सेनापती, क्षत्रिय, वैश्य, विद्युत आणि वायूशी मैत्री करतात, तेच लोक विजय संपादन करतात. ।। ९।।
Subject
आम्ही कल्याणासाठी कुणाला हाक द्यावी, पुढील मंत्रात हा विषय वर्णित आहे -
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. कारण की इथे ङ्गइन्द्रा- पूषणाफ या शब्दाचे एकाहून अधिक म्हणजे अनेक अर्थ आहेत. ।। ९।।