Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 201

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- भरद्वाजो बार्हस्पत्यः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
इ꣣मा꣡ उ꣢ त्वा सु꣣ते꣡सु꣢ते꣣ न꣡क्ष꣢न्ते गिर्वणो꣣ गि꣡रः꣢ । गा꣡वो꣢ व꣣त्सं꣢꣫ न धे꣣न꣡वः꣢ ॥२०१॥

इ꣣माः꣢ । उ꣣ । त्वा । सुते꣡सु꣢ते । सु꣣ते꣢ । सु꣣ते । न꣡क्ष꣢꣯न्ते । गि꣣र्वणः । गिः । वनः । गि꣡रः꣢꣯ । गा꣡वः꣢꣯ । व꣣त्स꣢म् । न । धे꣣न꣡वः꣢ ॥२०१॥

Mantra without Swara
इमा उ त्वा सुतेसुते नक्षन्ते गिर्वणो गिरः । गावो वत्सं न धेनवः ॥

इमाः । उ । त्वा । सुतेसुते । सुते । सुते । नक्षन्ते । गिर्वणः । गिः । वनः । गिरः । गावः । वत्सम् । न । धेनवः ॥२०१॥

Samveda - Mantra Number : 201
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 1; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 9;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(गिर्वणः) स्तुतिवाणीद्वारे वंदनीय वा याचनीय हे परमैश्वर्यवान इन्द्र परमेश्वर, (इमा) (उ) आम्ही उच्चारित करीत असलेल्या वेदवाणी वा स्तुतिवाणी (सुते सुते) आमच्या प्रत्येक ज्ञान, कर्म व उपासना या व्यवहाराद्वारे (त्वा) तुमच्याकडेच (नक्षन्हे) जातात वा प्राप्त होतात. ज्याप्रमाणे (धेनवः) दूध पाजविणाऱ्या वा दुधाने वासराला तृप्त करणाऱ्या (गावः) गायी (वत्सं न) आपल्या वासराकडे धाव घेतात. (तद्वत आमच्या स्तुती वा याचना आपल्याकडे येतात. आपण वासराप्रमाणे आमचे हृदय तृप्त करता.) ।। ८।।
Essence
जशा नवप्रसूता, परिपूर्ण पयोधरा गावी वासराला दूध पाजविण्यासाठी त्याच्याकडे पळत जातात, तद्वत आमच्या रसपूरित, अर्थपूर्ण स्तुतिवाणी प्रत्येक ज्ञान यज्ञात, कर्म यज्ञात आणि उपासना यज्ञात परमेश्वराकडे जायला पाहिजेत (आमच्या ज्ञान, कर्म व उपासनेत केवळ परमेश्वराचे ध्यान प्रगट व्हायला पाहिजे) ।। ८।।
Subject
पुढील मंत्रात स्तोताजन परमेश्वराला प्रार्थना करीत आहेत -
Special
या मंत्रात उपमा अलंकार आहे।। ‘वत्सं न धेनवः।। ८।।