Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 193

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वत्सः काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
त्वा꣡व꣢तः पुरूवसो व꣣य꣡मि꣢न्द्र प्रणेतः । स्म꣡सि꣢ स्थातर्हरीणाम् ॥१९३॥

त्वा꣡व꣢꣯तः । पु꣣रूवसो । पुरु । वसो । वय꣣म् । इ꣣न्द्र । प्रणेतः । प्र । नेतरि꣡ति । स्म꣡सि꣢꣯ । स्था꣣तः । हरीणाम् ॥१९३॥

Mantra without Swara
त्वावतः पुरूवसो वयमिन्द्र प्रणेतः । स्मसि स्थातर्हरीणाम् ॥

त्वावतः । पुरूवसो । पुरु । वसो । वयम् । इन्द्र । प्रणेतः । प्र । नेतरिति । स्मसि । स्थातः । हरीणाम् ॥१९३॥

Samveda - Mantra Number : 193
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 2; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 8;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(पुरुवसो) प्रभूत संपदेचे स्वामी (प्रणेतः) आणि आणि उत्कृष्ट नेता, (हरिणाम्) आकर्षण्णुणयुक्त पृथ्वी, सूर्य आदी लोकांचे अधिष्ठाता हे (इन्द्र) परमात्मन् / विषयांकडे प्रवृत्त करणाऱ्या इंद्रियांना नियंत्रित करणाऱ्या हे जीवात्मा अथवा विमानादी वाहनांचे (स्थातः) स्वामी व प्रमुख असलेले हे विद्वान वैज्ञानिक, (वयम्) आही मनुष्य (त्वावतः) तुमच्यासारखा कोणी इतर रक्षक नसल्यामुळे तुमचेच केवळ तुमचेचे (स्मसि) होऊन गेलो आहोत. कारण तुम्ही अद्वितीय आहात. ।। ९।।
Essence
विश्वात असलेल्या सर्व संपदाचा जो स्वामी, सर्वांचे जो नेता, सूर्यादी लोकांचा जो अधिष्ठाता, अनुपम असा परमेश्वर जसा सर्वांसाठी वंदनीय आहे, तसेच विविध ज्ञान, कर्म आदी धनांचा स्वामी, मार्गदर्शक, ज्ञानेन्द्रियें, कर्मेंद्रियांचा, प्राण, मन, बुद्धी आदीचा अधिष्ठाता जीवात्मादेखील सर्वांसाठी सेवनीय आहे. याचप्रमाणे अति वेगवान विमानादी यानांचे निर्माता, चालन कलेत निपुण, विविध विद्या पारंगत शिल्प शास्त्रज्ञाता विद्वान (म्हणजे वैज्ञानिक, वैमानिक, यांत्रिक जन) देखील सर्व मनुष्यांद्वारे सेवनीय व वंदनीय आहेत. ।। ९।।
या दशतीध्ये इन्द्राशी संबंधित वरुण, मित्र आणि अर्यमाकडून रक्षण मिळावे याविषयी प्रार्थना, इन्द्राच्या गायींची प्रशंसा इन्द्राकडून गौ, अश्व आदींची याचना, इंद्राच्या सरस्वतीचे आवाहन, इंद्राचे स्तुतिगान तसेच इंद्र या शब्दाने राजा, विद्वान, आचार्य आदी विषय वर्णित आहेत. त्यामुळे या दशतीच्या अर्थाची संगती या पूर्वीच्या दशतीच्या अर्थाशी आहे, असे जाणावे.।।
द्वितीय प्रपाठकाच्या द्वितीय अर्धातील पाचवी दशती समाप्त।
इथे द्वितीय प्रपाठक संपूर्ण.
द्वितीय अध्यायातील अष्टम खंड समाप्त.
तृतीय प्रपाठक आरंभ
Subject
पुढील मंत्रात इन्द्र या नावाने परमात्मा, जीवात्मा आणि विद्वान या सर्वांना संबोधून कथन केले आहे -
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ङ्गकमळ पुष्प कमळ पुष्पाप्रमाणे आहेफ या अलंकारोक्तीप्रमाणे असल्यामुळे ङ्गत्वावतःफ या शब्दात अनन्वय अलंकार आहे. (तुझ्यासारखा तूच आहेस) ।। ९।।