Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 188

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- श्रुतकक्षः सुकक्षो वा आङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
अ꣣या꣢ धि꣣या꣡ च꣢ गव्य꣣या꣡ पु꣢꣯रुणामन्पुरुष्टुत । य꣡त्सोमे꣢꣯सोम꣣ आ꣡भु꣢वः ॥१८८॥

अ꣣या꣢ । धि꣣या꣢ । च꣣ । गव्यया꣢ । पु꣡रु꣢꣯णामन् । पु꣡रु꣢꣯ । ना꣣मन् । पुरुष्टुत । पुरु । स्तुत । य꣢त् । सो꣡मे꣢꣯सोमे । सो꣡मे꣢꣯ । सो꣣मे । आ꣡भु꣢꣯वः । आ꣣ । अ꣡भु꣢꣯वः ॥१८८॥

Mantra without Swara
अया धिया च गव्यया पुरुणामन्पुरुष्टुत । यत्सोमेसोम आभुवः ॥

अया । धिया । च । गव्यया । पुरुणामन् । पुरु । नामन् । पुरुष्टुत । पुरु । स्तुत । यत् । सोमेसोमे । सोमे । सोमे । आभुवः । आ । अभुवः ॥१८८॥

Samveda - Mantra Number : 188
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 2; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 8;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (पुरुणामन्) सर्वान्तर्यामी परमात्मा, वेदांमध्ये शक्र, वृक्षहा, मघवान्, शचीपती आदी अनेक नावांनी तुम्ही वर्णित आहात. हे (परुष्टुत) बहुप्रशंसित इन्द्र परमात्मा, (अया) या (गन्यया) आत्मारूप सूर्याची किरणे प्राप्त करण्याची कामना करणाऱ्या (घिया) बुद्धीद्वारे व ध्यान शृंखलेद्वारे हे शक्य आहे की तुम्ही (सोमे सोमे) आमच्या श्वासाश्वासात, प्रत्येक प्राणात (आभुवः) व्याप्त होऊ शकता. ।। ४।।
Essence
तमोगुणाने झाकळून गेलेल्या आत्मरूप सूर्याच्या किरणांना निश्चयात्मक बुद्धीद्वारे तसेच ध्यानाद्वारे प्राप्त करण्याचा जेव्हा आम्ही उपासक यत्न करतो, तेव्हाच हे शक्य आहे की परमेश्वर आमच्या प्राणा-प्राणात, श्वासा-श्वासात आणि रोमारोमात व्याप्त होईल. ।। ४।।
Subject
पुढील मंत्रात परमात्म प्राप्तीचा उपाय सांगितला आहे -