Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 184

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- उलो वातायनः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
वा꣢त꣣ आ꣡ वा꣢तु भेष꣣ज꣢ꣳ श꣣म्भु꣡ म꣢यो꣣भु꣡ नो꣢ हृ꣣दे꣢ । प्र꣢ न꣣ आ꣡यू꣢ꣳषि तारिषत् ॥१८४॥

वा꣡तः꣢꣯ । आ । वा꣢तु । भेषज꣢म् । शं꣣म्भु꣢ । श꣣म् । भु꣢ । म꣣योभु꣢ । म꣣यः । भु꣢ । नः꣣ । हृदे꣢ । प्र । नः꣣ । आ꣡यूँ꣢꣯षि । ता꣣रिषत् ॥१८४॥

Mantra without Swara
वात आ वातु भेषजꣳ शम्भु मयोभु नो हृदे । प्र न आयूꣳषि तारिषत् ॥

वातः । आ । वातु । भेषजम् । शंम्भु । शम् । भु । मयोभु । मयः । भु । नः । हृदे । प्र । नः । आयूँषि । तारिषत् ॥१८४॥

Samveda - Mantra Number : 184
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 7;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(आम्ही ईश - उपासक कामना करीत आहोत की) (वाता) वायूचे संचालन- प्रवहण करणारा परमेश्वर अथवा परमेश्वराद्वारे रचित वायू आणि प्राण (भेषजम्) औषधी (आवातु) प्राप्त करू दे (आमच्यासाठी औषधी- वनस्पती आदी उत्पन्न करू दे) कारण की (यत्) तो वायू (नः) आमच्या (हृदे) हृदयासाठी (शम्भु) रोगशमन करणारा व (मयोभुः) सुखकारक होवोत. तो परमेश्वर, वायू आणि आमची प्राणशक्ती हे सर्व (नः) आमचे (आयूंषि) आयुष्य (प्रतारिषत्) वाढविणारे होवोत.।। १०।।
Essence
ईश्वर प्रणिधानपूर्वक प्राणायाम केल्याने चित्तशुद्धी होऊन हृदयास शक्ती आणि शरीराला आरोग्य व दीर्घायुष्य मिळते. ।। १०।।
या दशतीमध्ये इन्द्र परमेश्वराच्या साह्याने अविद्या, अधर्म आदी रूप अंधाकाराने भरलेल्या रात्रीचे निवारण, दिव्य उषेचा प्रादुर्भाव, इन्द्रद्वारे वृत्राचा संहार, परमात्मा, वायू आणि प्राण यांच्याद्वारे औषध प्राप्ती, तसेच राजा आणि आचार्य यांच्या यथोचित योगदानाचे वर्णऩ आहे. यामुळे या दशतीच्या विषयांशी मागील दशतीच्या विषयांची संमती आहे, असे जाणावे. ।।
द्वितीय प्रपाठकातील द्वितीय अर्धाची चतुर्थ दशती समाप्त.
द्वितीय अध्यायातील सप्तम खण्ड समाप्त.
Subject
पुढील मंत्रात वाता (वायू)पासून औषधीची कामना केली आहे -
Special
या मंत्रात श्लेषालंकार आहे. ‘वात, वातु’ या शब्दात छेकानुप्रास आहे.।। १०।।