Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 183

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- शुनः शेप आजीगर्तिः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
अ꣣य꣡मु꣢ ते꣣ स꣡म꣢तसि क꣣पो꣡त꣢ इव गर्भ꣣धि꣢म् । व꣢च꣣स्त꣡च्चि꣢न्न ओहसे ॥१८३॥

अ꣣य꣢म् । उ꣣ । ते । स꣢म् । अ꣣तसि । कपो꣡तः꣢ । इ꣣व । गर्भधि꣣म् । ग꣣र्भ । धि꣢म् । व꣡चः꣢꣯ । तत् । चि꣣त् । नः । ओहसे ॥१८३॥

Mantra without Swara
अयमु ते समतसि कपोत इव गर्भधिम् । वचस्तच्चिन्न ओहसे ॥

अयम् । उ । ते । सम् । अतसि । कपोतः । इव । गर्भधिम् । गर्भ । धिम् । वचः । तत् । चित् । नः । ओहसे ॥१८३॥

Samveda - Mantra Number : 183
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 7;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे इन्द्र परमात्मन् (अयम्) हा उपासक (उ) खरेच (तव) तुझाच आहे. यामुळेच तू (समतसि) त्याच्याजवळ पोहचतोस. (कपोतः इव) ज्याप्रमाणे एक कबूतर (गर्भधिम्) अंड्यापासून नुकतेच जन्मलेल्या आपल्या पिल्ल्यांच्या घरट्याकडे धावतो, त्याप्रमाणे तू (नः) आमची (वच) स्तुतिवचने ऐकून आम्हा उपासकांकडे धावून येतोस आणि (तत् चित्) यावरून आम्हास कळते की तू आमच्या प्रार्थनेचा (ओहसे) स्वीकार करतोस.।। ९।।
Essence
जसा एक कबूतर घरट्यातील आपल्या पिल्यांच्या संगोपन व पालनासाठी घरट्याकडे जातो, तसाच परमेश्वर आपल्या शिशु (म्हणजे नवीन) उपासकांसाठी त्यांच्याजवळ जातो. जसा कबूतर आपल्या पिल्ल्यांचा आवाज मोठ्या उत्सुकतेने ऐकतो, तद्वत परमेश्वर आपल्या स्तोताजनांची स्तुतिवचने मोठ्या प्रेमाने ऐकतो. ।। ९।।
Subject
पुढील मंत्रात परमेश्वराची आपला स्नेह- संबंध सूचित केला आहे -
Special
यास्काचार्यांनी या मंत्रातील प्रथम भागातील ‘उ’ या शब्दाला पदपूरक म्हटले आहे (त्याचा स्वतंत्र अर्थ नसून केवळ मात्रापूर्तीसाठी ङ्गउफ ध्वनी येथे प्रयुक्त केला आहे) निरुक्त १/ १० या मंत्रात उपमा अलंकार आहे. ।। ९।।