Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 180

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- मधुच्छन्दा वैश्वामित्रः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
इ꣢꣯न्द्रेहि꣣ म꣡त्स्यन्ध꣢꣯सो꣡ वि꣡श्वे꣢भिः सोम꣣प꣡र्व꣢भिः । म꣣हा꣡ꣳ अ꣢भि꣣ष्टि꣡रोज꣢꣯सा ॥१८०॥

इ꣡न्द्र꣢꣯ । आ । इ꣣हि । म꣡त्सि꣢꣯ । अ꣡न्ध꣢꣯सः । वि꣡श्वे꣢꣯भिः । सो꣣म꣡पर्व꣢भिः । सो꣣म । प꣡र्व꣢꣯भिः । म꣣हा꣢न् । अ꣣भिष्टिः꣢ । ओ꣡ज꣢꣯सा ॥१८०॥

Mantra without Swara
इन्द्रेहि मत्स्यन्धसो विश्वेभिः सोमपर्वभिः । महाꣳ अभिष्टिरोजसा ॥

इन्द्र । आ । इहि । मत्सि । अन्धसः । विश्वेभिः । सोमपर्वभिः । सोम । पर्वभिः । महान् । अभिष्टिः । ओजसा ॥१८०॥

Samveda - Mantra Number : 180
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 7;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(प्रथम अर्थ) - परमात्मपर - (इन्द्र) दुर्गुण- विदारक आणि सद्गुण - प्रदायक हे परमेश्वर, आपण (आइहि) आमच्या जीवनयज्ञामध्ये या (तुमचमुळे आमचे जीवन आनंद व उत्साहाने भरून जाऊ द्या) (अन्धसः) आमच्या पुरुषार्थरूप अन्नाने तसेच (विश्वेभिः) सर्व (सोमपर्वभिः) भक्तिरसारोहाद्वारे (मत्सि) प्रसन्न व्हा. आपण (महान्) महान असून (ओजसा) तुमच्या बळाने (अभिष्टिः) आमच्या काय, क्रोधादी शत्रूंवर आक्रमण करणारे आहात.
द्वितीय अर्थ - (विद्वानपर) - हे (इन्द्र) विद्यारूप ऐश्वर्याने संपन्न असलेले विद्वान, आपण (आ इहि) इथे या आणि (अन्धसः) सात्त्विक भोजनाने तसेच (विश्वेभिः) समस्त (सोमपर्रभिः) शक्ती वाढविणाऱ्या सोम आदी औषधीच्या सेवनाने (मत्सि) तृप्त व्हा. आपण (महान्) आपल्या महान (ओजसा) विद्याबळाद्वारे (अभिष्टिः) इच्छित पदार्थ प्राप्त करविणारे तसेच समाजातून अविद्या, दुचारण आदी दुर्गुणांवर आक्रमण करणारे व्हा. ।। ६।।
Essence
जसा पुरुषार्थाने आणि भक्तीने प्रसन्न केलेला परमेश्वर मनुष्याच्या काम, क्रोध, हिंसा, उपद्रव आदी सर्व शत्रूंना एका क्षणात विनष्ट करतो, तद्वत विद्वान मनुष्यानेही आपल्या सात्त्विक वृत्तीद्वारे पुष्टिप्रद अन्न व औषधीचे सेवन करून त्याद्वारे राष्ट्रातील अविद्या आदी दुर्गुणआंचा नाश केला पाहिजे. ।। ६।।
Subject
आत इन्द्र नावाने परमेश्वराचे व विद्वानांचे आवाहन केले आहे -
Special
या मंत्रात श्लेषालंकार आहे. ।। ६।।