Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 179

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- गोतमो राहूगणः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
इ꣡न्द्रो꣢ दधी꣣चो꣢ अ꣣स्थ꣡भि꣢र्वृ꣣त्रा꣡ण्यप्र꣢꣯तिष्कुतः । ज꣣घा꣡न꣢ नव꣣ती꣡र्नव꣢꣯ ॥१७९॥

इ꣡न्द्रः꣢꣯ । द꣣धीचः꣢ । अ꣣स्थ꣡भिः꣢ । वृ꣣त्रा꣡णि꣢ । अ꣡प्र꣢꣯तिष्कुतः । अ । प्र꣣तिष्कुतः । जघा꣡न꣢ । न꣣वतीः꣢ । न꣡व꣢꣯ ॥१७९॥

Mantra without Swara
इन्द्रो दधीचो अस्थभिर्वृत्राण्यप्रतिष्कुतः । जघान नवतीर्नव ॥

इन्द्रः । दधीचः । अस्थभिः । वृत्राणि । अप्रतिष्कुतः । अ । प्रतिष्कुतः । जघान । नवतीः । नव ॥१७९॥

Samveda - Mantra Number : 179
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 7;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(अप्रतिष्कुतः) आंतरिक देवासुर संग्रामात असुर ज्याचा मुळीच प्रतिकार करू शकत नाहीत अथवा जो असुतांद्वारे केव्हाही पराजित होत नाही, असा (इन्द्रः) बलवान जीवाला वा परमात्मा (दधीचः) ध्यान मग्न नाने (अस्थभिः) अस्थिसम सुदृढ सात्त्विक वृत्तीद्वारे (नवतीनव) नव्याण्णवे (वृत्राणि) विशाचरांना (जघान) ठार करतो (मनातील दृढ सत्प्रवृत्तीद्वारे साधकाचा आत्मा दुष्ट प्रवृत्तींचा नाश करतो.) ते नव्याण्णवे (९९) निशाचर कोणते ? ते से - दहा इंद्रिये, दहा प्राण, आठ चक्र, अंतःकरण चतुष्ट्य आणि शरीर या तेहतीस साधनांद्वारे भूतकाळात केलेले, वर्तमान काळात घडणारे आणि भविष्यकाळात होणारे पाप. या सर्व प्रकारच्या पापांना जीवात्मा व परमात्मा सावधान मनाच्या सात्त्विक वृत्तींद्वारे नष्ट करून टाकतो. ।। २।।
Essence
या पूर्वीच्या मंत्रात रात्रीचे आणि तिच्या निवारणार्थ उषेच्या प्राधुर्भावाचे क्रमशः वर्णऩ केले आहे. या मंत्रात रात्रीच्या वेळ (बेसावध मनोदशेत) उत्पन्न होणाऱ्या निशाचरांच्या विनाशाचे वर्णऩ केले आहे. त्यात म्हटले आहे की इन्द्र दध्यड्च्या अस्थींद्वारे त्या निशाचरांना (दुष्ट विचारांना( ठार करतो. हा इन्द्र म्हणजे शरीरात विद्यमान जीवात्मा आणि हृदयात विद्यमान परमात्मा. दध्यड् म्हणजे मन. या मनाच्या सात्त्विक रूप वृत्ती रूप अस्थीद्वारे त्या निशाचरांचा वध संभवतो. ।। ५।।
Subject
रात्री जे विशाचर प्रकट होतात, त्यांचा वध कशा प्रकारे केला जातो, हे पुढील मंत्रात सांगितले आहे -
Special
विवरणकार माधव याने या मंत्राची व्याख्या करताना त्यात इतिहास दर्शविला आहे - ङ्गङ्घकालकंज नावाचे काही असुर होते. ते देवांना त्रास देत होते. त्रस्त वा पीडित देवगण ब्रह्माजवळ गेले आणि म्हणाले, ‘‘भगवन्, कालकंज असुर आम्हाला सतावीत आहेत. त्यांचा वध करण्याचा काही तरी उपाय करा. देवांची प्रार्थना ऐकून ब्रह्मा म्हणाले, ‘दधीचि नावाचा एक ऋषी आहे. त्याला विनंती करा. तो असुर संहाराचा उपाय सांगेल वा काही योजना करील. देवांना ते स्वीकार्य झाले. ते दधीचिजवळ जाऊन म्हणाले, ‘भगवन्, असुरांचा पुरोहित असलेला शुक्र आमची अस्त्रे चोरून नेतो. आपण आमच्या अस्त्रांचे रक्षण करा.’ ऋषी म्हणाले, ‘तुमची अस्त्रे माझ्या मुखात ठेवा. ते ऐकून इन्द्र आदी देवांनी व मरुद्वणांनी सर्व अस्त्र- शस्त्रे ऋषीच्या मुखात घातली. नंतर जेव्हा देवासुर संग्रामाचा प्रसंग उद्भवला, तेव्हा देवगण ऋषीजवळ जाऊन म्हणाले, ‘आमची अस्त्रे आम्हाला द्या.’ ऋषी म्हणाले, ‘माझ्या उदरात जाऊन त्या अस्त्र - शस्त्रांचे पचन झाले. आता ती अस्त्रे पुन्हा मिळणे शक्य नाही. तेव्हा प्रजापती आदी देवगण म्हणाले, ‘भगवन्, मग आपण आता प्राण त्याग करा (म्हणजे तुमच्या उदरातील अस्त्रे आम्हाला मिळतील) ते ऐकून दधीचि ऋषीने प्राण त्यागले. मग ददीचिच्या अस्थीनी निर्मित शस्त्रांद्वारे इन्द्राने वृत्रांचा वध केला.
सायणाने शाक्यायनियांचा संदर्भ देत त्यांच्या नावाने या मंत्रात अशा प्रकारे इतिहास दाखविला आहे - अथर्वाचा पुत्र दधीचि जोपर्यंत जिवंत होता, तोपर्यंत त्याच्या असा काही प्रभाव होता की त्याच्या केवळ दृष्टीने असुर पराजित होत असत, पण त्याच्या निधनानंतर सारी पृथ्वी असुरांनी व्यापून गेली. मग जेव्हा इन्द्राने पाहिले की आता असुरांसी युद्ध करणे देवांना शक्य नाही, तेव्हा त्याने दधीचि ऋषीविषयी चौकशी केली. त्याला समजले की दधीचि ऋषी स्वर्गस्थ झाले. यामुळे इन्द्राने तेथील लोकांना विचारले की दधीचि ऋषीच्या शरीराचा एखादा अवयव शेष राहिला आहे का ? लोकांनी सांगितले की ऋषीचे घोड्यासारखे असलेले ते शिर शेष राहिले आहे की ज्या शिराने ऋषीने अश्विदेवांना मधुविद्येविषयी प्रवचन सांगितले होते, पण आम्ही हे सांगू शकत नाही की ते शिर आहे कुठे ? तेव्हा इन्द्राने ते शिर शोधून आणण्याचा आदेश दिला. लोकांनी ते शोधण्यास आरंभ केला तेव्हा त्यांना कुरक्षेत्राच्या जघनर्धात (पाण्याच्या तळात प्रवाहित होणाऱ्या) शर्थणावत नावाच्या सरोवरात ते शिर सापडले. त्या शिराच्या अस्थींद्वारे इन्द्राने असुरांचा वध केला.
पुराण, महाभारत आदी अन्य काही ग्रंथात थोड्याशा फरकाने आणि काही नवीन पात्रांची कल्पना करून हीच कथा सांगितलेली आढळते. त्या सर्व कथा याच मंत्राला आधार मानून रचलेल्या आहेत, पण त्या वास्तविक वा सत्य न मानता अलंकारिक आहेत असे समजले पाहिजे. (हे सत्य जाणून घेतले पाहिजे की देवासुर संग्राम म्हणजे काय) वास्तविक पाहता आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक असो, सर्वत्र एक प्रकारचा देवासुर संग्राम सुरू आहे. माणसाच्या मनातील दिव्य सत्प्रवृत्तीमध्ये आणि आसुरी दुष्यवृत्तीमध्ये होणारा संग्राम हा आध्यात्मिक क्षेत्रातील संग्राम आहे. आम्ही मंत्राच्या भाष्यामध्ये याच संग्रामाचा उल्लेख केला आहे. इन्द्र परमेश्वर इध्यड्च्या अर्थात सूर्याच्या अस्थींद्वारे अर्थात अस्थीसमान शभ्र किरणांद्वारे मेघांचा आणि रोगादींचा वध करतो, ही आधिदैविक व्याख्या आहे. इन्द्र राजा दध्यड् सेनापतीच्या अस्थींनी अर्थात अस्थीसमान सुदृढ अस्त्र- शस्त्रांनी शत्रूंचा संहार करतो. ही आधिभौोतिक व्याख्या आहे. दध्यड् नावाच्या कोणा ऐतिहासिक मुनिवशेषाची गाथा वेदात असणे कदापि शक्य नाही. कारण की वेद इतिहासात उल्लिखित सर्व मुनीपेक्षा पूर्वी आहेत. मग वेदानंतर जन्मलेल्या वा असलेल्या मुनीचे वर्णऩ वेदात असणे कसे शक्य आहे ?
ऋषी दयानंदाने ऋग्वेद भाष्यात (ऋग्वेद १/८४/१३) या मंत्रावर भाष्य करताना सूर्याच्या दृष्टान्तावरून सेनाध्यक्षाच्या कर्तव्यांचे वर्णन केले आहे. तिथे त्यानी मंत्राचा केलेला भावार्थ असा आहे - ‘इथे वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. मनुयांनी (वा राष्ट्राच्या नागरिकांनी) त्यालाच सेनापती म्हणून निवडावे की जो सूर्यासम तेजस्वी सून दुष्टांचा, शत्रूचा विनाश करतो आणि जो आपल्या सैन्याचे रक्षण करण्यास समर्थ आहे. ।।’
आत इन्द्र नावाने परमेश्वराचे व विद्वानांचे आवाहन केले आहे -