Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 159

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- इरिम्बिठिः काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
अ꣣यं꣡ त꣢ इन्द्र꣣ सो꣢मो꣣ नि꣡पू꣢तो꣣ अ꣡धि꣢ ब꣣र्हि꣡षि꣢ । ए꣡ही꣢म꣣स्य꣢꣫ द्रवा꣣ पि꣡ब꣢ ॥१५९॥

अ꣣य꣢म् । ते꣣ । इन्द्र । सो꣡मः꣢꣯ । नि꣡पू꣢꣯तः । नि । पू꣣तः । अ꣡धि꣢꣯ । ब꣣र्हि꣡षि꣢ । आ । इ꣣हि । ईम् । अस्य꣢ । द्र꣡व꣢꣯ । पि꣡ब꣢꣯ ॥१५९॥

Mantra without Swara
अयं त इन्द्र सोमो निपूतो अधि बर्हिषि । एहीमस्य द्रवा पिब ॥

अयम् । ते । इन्द्र । सोमः । निपूतः । नि । पूतः । अधि । बर्हिषि । आ । इहि । ईम् । अस्य । द्रव । पिब ॥१५९॥

Samveda - Mantra Number : 159
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 2; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (इन्द्र) परमैश्वर्यवान परमात्मन्, (अयम्) हा (सोमः) श्रद्धारस (तुभ्यम्) तुमच्यासाठी (बर्हिषि अधि) हृदयरूप अंतरिक्षात (मिपूतः) पूर्णतः पवित्र केला गेला आहे. (सहि) तुम्ही या (ईम्) या रसाकडे (द्रव) दौडत या आणि (अस्म्) याचा बराच वा काही भाग (पिव) सेवन करा. ।। ५।।
Essence
जसे अंतरिक्षस्य मेघजन पवित्र असते, तद्वत हृदय अंतरिक्षात स्थित श्रद्धारस मी म्हणजे तुझ्या उपासकाने, पूर्णपणे पवित्र करून घेतला आहे. मी पवित्र केलेल्या त्या श्रद्धा रसाचे पान करण्याकरिता, हे परमेश्वरा, तू त्वरित ये आणि उत्कंठित होऊन तो रस तू पी, की ज्यामुळे मी कृतकृत्य होईन. या ठिकाणी हे समजून घेतले पाहिजे की परमेश्वर सव़र्व्यापी आणि निरवयव (अंगरहित) असल्यामुळे त्याच्याविषयी येणे, जाणे, पिणे या क्रिया संभवत नाहीत. म्हणून येथे आगमनाचा प्रकट होणे (अनुभूत होणे) आणि ङ्गपिणेफ याचा अर्थ स्वीकार करणे, असा अर्थ लक्षणा वृत्तीद्वारे घेणे आवश्यक आहे. ।। ५।।
Subject
पुढील मंत्रात इन्द्राला रमपानासाठी आमंत्रित केले जात आहे -