Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 158

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- श्रुतकक्षः सुकक्षो वा आङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
इ꣡न्द्रा꣢य꣣ म꣡द्व꣢ने सु꣣तं꣡ परि꣢꣯ ष्टोभन्तु नो꣣ गि꣡रः꣢ । अ꣣र्क꣡म꣢र्चन्तु का꣣र꣡वः꣢ ॥१५८॥

इ꣡न्द्रा꣢꣯य । म꣡द्व꣢꣯ने । सु꣣त꣢म् । प꣡रि꣢꣯ । स्तो꣡भन्तु । नः । गि꣡रः꣢꣯ । अ꣣र्क꣢म् । अ꣣र्चन्तु । कार꣡वः꣢ ॥१५८॥

Mantra without Swara
इन्द्राय मद्वने सुतं परि ष्टोभन्तु नो गिरः । अर्कमर्चन्तु कारवः ॥

इन्द्राय । मद्वने । सुतम् । परि । स्तोभन्तु । नः । गिरः । अर्कम् । अर्चन्तु । कारवः ॥१५८॥

Samveda - Mantra Number : 158
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 2; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(मद्वने) आनंदमय (इन्द्राय) परमैश्वर्यवान परमेस्वरासाठी (सुतम्) पिकून काढलेला (म्हणजे हृदयाच्या चिंतन- मननातून निष्पादित केलेल्या) भक्तिरूप सोमरस (नः) आमच्या (गिरः) वाणी मघे (परिष्टोबन्तु) तरंगित व्हावा. (आम्ही हृदय व वाणीद्वारे केवळ त्याचेच ध्यान करावे.) (कारवः) अन्य स्तोताजनांनीदेखील (अर्कम्) त्या अर्चनीय देवाची (अर्चन्तु) प्रार्थना केली पाहिजे. ।। ४।।
Essence
आनन्द प्राप्त करण्याच्या उद्देशाने मी प्रेमरसात मग्न होऊन परमानंदमय परमेश्वरासाठी जो भक्तिरस प्रवाहित करीत आहे, त्या रससागरात माझी स्तुति वाणी लहरी उत्पन्न करीत आहे. अन्य स्तुतिगीत गायकांनीदेखील माझ्याप्रमाणे परमेश्वराची अर्चना केली पाहिजे की ज्यामुळे सर्व वातावरण भक्तिमय व संगीत लहरींनी तरंगित होऊन जावे ।। ४।।
Subject
आम्ही परमेश्वराचे अर्चन (स्तुती, पूजन) करतो, पुढील मंत्रात हा विषय वर्णित आहे -