Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 156

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वसिष्ठो मैत्रावरुणिः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
प्र꣢ व꣣ इ꣡न्द्रा꣢य꣣ मा꣡द꣢न꣣ꣳ ह꣡र्य꣢श्वाय गायत । स꣡खा꣢यः सोम꣣पा꣡व्ने꣢ ॥१५६॥

प्र꣢ । वः꣣ । इ꣡न्द्रा꣢꣯य । मा꣡द꣢꣯नम् । ह꣡र्य꣢꣯श्वाय । ह꣡रि꣢꣯ । अ꣣श्वाय । गायत । स꣡खा꣢꣯यः । स । खा꣣यः । सोमपा꣡व्ने꣢ । सो꣡म । पा꣡व्ने꣢꣯ ॥१५६॥

Mantra without Swara
प्र व इन्द्राय मादनꣳ हर्यश्वाय गायत । सखायः सोमपाव्ने ॥

प्र । वः । इन्द्राय । मादनम् । हर्यश्वाय । हरि । अश्वाय । गायत । सखायः । स । खायः । सोमपाव्ने । सोम । पाव्ने ॥१५६॥

Samveda - Mantra Number : 156
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 2; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
प्रथम अर्थ (परमात्मपर) हे (सखायः) मित्रहो, (वः) तुम्ही (हर्य़श्वाय) ज्याने उत्पन्न केलेले घोडे, पशू अथवा सूर्य- चंद्र - वायू - मेघ - प्राण आदी अत्यंत वेगवान आहेत, अशा त्या (सोमपावने) भक्तिरूप सो मरसाचे सेवन करणाऱ्या आदी चंद्र आदी लोकांचे रक्षक त्या (इन्द्राम) परमैश्वर्यवान परमेश्वरासाठी (मादनम्) आनंददायी व तृप्तिदायी स्तोत्र ( प्र गायत) प्रकृष्टरूपएण गा (गायनामुळे आनंद व तृप्ती तुम्हाला होईल. तो परमेश्वर नित्य आनंदमय आहे. त्याच्या स्तुतिगानाने तुम्ही आनंद मिळवा.) ।।
द्वितीय अर्थ - (राजापर) हे (सखायः) माझ्या मित्राप्रमाणे असलेले प्रजाननहो (वः) तुम्ही (हर्षश्वाय) ज्याचे अश्वयान, अग्निवान, वायुयान, विद्युतमान आदी यान अत्यंत वेगवान आहेत, त्या (सोम पाव्ने) राष्ट्रात ब्रह्म- क्षत्रांचे रक्षक आणि यज्ञाचे रक्षक असलेल्या (इन्द्राय) ऐश्वर्यशाली व शत्रुविदारक राजाकरिता वा त्याच्याविषयी (मादनम्) हर्षदायी व उत्साहकारक उद्बोधन गीत वा विजयगीत (प्र गायत) उत्तम रीतीने अवश्य गा ।। २।।
Essence
सर्व मित्रांनी मिळून परमेश्वराचे स्तुतिगीत गायिले पाहिजे आणि प्रजाजनांनी युद्धारंभप्रसंगी वा विजयोत्सव प्रसंगी राजाकरिता उद्बोधन गीत आणि विजय गीत ताल, स्वर व लयीत गायिले पाहिजे. ।। २।।
Subject
पुन्हा इन्द्राचे गुणगान करण्याकरिता प्रजेला प्रेरणा केली आहे -
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ।। २।।