Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 154

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- शुनःशेप आजीगर्तिः, वामदेवो वा Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
सो꣡मः꣢ पू꣣षा꣡ च꣢ चेततु꣣र्वि꣡श्वा꣢साꣳ सुक्षिती꣣ना꣢म् । दे꣣वत्रा꣢ र꣣꣬थ्यो꣢꣯र्हि꣣ता꣢ ॥१५४

सो꣡मः꣢꣯ । पू꣣षा꣢ । च꣣ । चेततुः । वि꣡श्वा꣢꣯साम् । सु꣣क्षितीना꣢म् । सु꣣ । क्षितीना꣢म् । दे꣣वत्रा꣢ । र꣣थ्योः꣢꣯ । हि꣣ता꣢ ॥१५४॥

Mantra without Swara
सोमः पूषा च चेततुर्विश्वासाꣳ सुक्षितीनाम् । देवत्रा रथ्योर्हिता ॥१५४

सोमः । पूषा । च । चेततुः । विश्वासाम् । सुक्षितीनाम् । सु । क्षितीनाम् । देवत्रा । रथ्योः । हिता ॥१५४॥

Samveda - Mantra Number : 154
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 2; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(सोमः पूषा च) चंद्र आणि सूर्य अथवा मन आणि आत्मा (विश्वासाम् सुक्षितीनाम्) सव उत्तम प्रजाजनांवर (सर्व सदाचारी लोकांवर) (चेततुः) उपकार करणे जाणतात. तसेच ते चंद्र- सूर्य (देवत्रा) विद्वज्जनांपैकी जे (रथ्योः) रथारूढ महारथीप्रमाणे प्रगती यत्नवान असतात त्यांच्यासाठी म्हणजे गुरू- शिष्य, माता- पिता, पत्नी- यजमान, स्त्री-पुरुष, शास्त्र- शासक आदींसाठी ते चंद्र- सूर्य (हिम) हितकर असतात. ।। १०।।
Essence
हा इन्द्र परमेश्वराचाच महिमा आहे की त्याने निर्मिलेल्या या जगात सौम्य चंद्रमा व वैजस सूर्य तसेच मानव शरीरात सौम्य मन व तैजस आत्मा दोन्ही प्राण आदीचे दान करीत सर्व लोकांवर उपकार करीत असतात. ज्याप्रमाणे एक रथारूढ रथस्वामी आणि सारथी अथवा राजा-राणी मार्गाक्रमण करीत असतात, तद्वत जे गुरू- शिष्य, माता-पिता, पिता - पुत्र, पत्नी- अजमान, स्त्री-पुरुष, शासित - शासक आदी लोक उन्नतीसाठी यत्न करतात, चंद्र व सूर्य हे दोघे तसेच मन- आत्मा हे दोघे त्या यत्नशील सर्व जनांसाठी परम हितकारी होतात. ।। १०।।
या दशतीमध्ये इन्द्र तसेच इंद्रद्वारे रचित भूमी, गौ, वेदवाणी, चंद्र, सूर्य आदीचे महत्त्व प्रतिपादित असून इंद्राकडून ऋत व मेधा यांची प्राप्तीविषयी वर्णऩ केले आहे, त्यामुळे या दशतीच्या विषयांशी मागील दशतीच्या विषयांनी संगती आहे, असे जाणावे.।।
द्वितीय प्रपाठकातील द्वितीय अर्धातील प्रथम दशती समाप्त
द्वितीय अध्ययातील चतुर्थ खंड समाप्त.
Subject
पुढील मंत्रात सोम आणू पूजा यांच्या गुण- कर्मांच्या वर्णनाद्वरे इन्द्र परमेश्वराचा महिमा व्यक्त केला आहे -