Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 147

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- गोतमो राहूगणः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
अ꣢꣫त्राह꣣ गो꣡र꣢मन्वत꣣ ना꣢म꣣ त्व꣡ष्टु꣢रपी꣣꣬च्य꣢꣯म् । इ꣣त्था꣢ च꣣न्द्र꣡म꣢सो गृ꣣हे꣢ ॥१४७॥

अ꣡त्र꣢꣯ । अ꣡ह꣢꣯ । गोः । अ꣣मन्वत । ना꣡म꣢꣯ । त्व꣡ष्टुः꣢꣯ । अ꣣पीच्य꣢꣯म् । इ꣣त्था꣢ । च꣣न्द्र꣡म꣢सः । च꣣न्द्र꣢ । म꣣सः । गृहे꣢ ॥१४७॥

Mantra without Swara
अत्राह गोरमन्वत नाम त्वष्टुरपीच्यम् । इत्था चन्द्रमसो गृहे ॥

अत्र । अह । गोः । अमन्वत । नाम । त्वष्टुः । अपीच्यम् । इत्था । चन्द्रमसः । चन्द्र । मसः । गृहे ॥१४७॥

Samveda - Mantra Number : 147
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 2; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
प्रथम अर्थ (सूर्यापासून चंद्राचे प्रकाशित होणे).
(त्वष्टुः) विच्छेदक (किरणांचे विच्छेदन वा विभाजन करण्यास समर्थ) आणि आपल्या प्रकाशाद्वारे अतिशीघ्र व्याप्त होणाऱ्या वा शीघ्र गतीने जाणाऱ्या देदीप्यमान सूर्याच्या (गोः) सुषुम्ण नाम रश्मीच्या (अत्र इह) इथे (चन्द्रमसः) (गृहे) चंद्रमंडळात (अपीच्यम्) प्रच्छन्नरूपाने (नाम) अवस्थानाला विद्वान जन (इत्था) सत्य रूपाने (अमन्वत) मानतात. म्हणजे चंद्रमा सूर्यामुळे प्रकाशित होतो, हे रहस्य विवज्जन पूर्णरूपेण जाणतात. ।।
विरुक्तात म्हटले आहे की सूर्याचा एक रश्मिसमूह चन्द्राकडे जाऊन त्याला प्रकाशित करतो, म्हणजे आदित्यामुळेच चंद्राची दीप्ती आहे. वेदांतदेखील सांगितले आहे की ‘‘सुषुम्ण नावाच्या काही सूर्यरश्मी आहेत, चंद्र त्या रश्मी धारण करतो, म्हणून तो गन्धर्व आहे.’’ (यजु. १८/ ४०) ‘अत्रा’ गोरमन्वत’ आदी मंत्रांमध्ये ‘गोः’ शब्द चन्द्राला प्रकाशित करणाऱ्या त्या सुषुम्ण नाम रश्मीसाठीच आला आहे.
द्वितीय अर्थ - (परमात्मपर) (त्वष्टुः) दुःख विच्छेदक सर्वत्र व्यापक, तेजोमय आणि जगमिर्माता इन्द्र नाम परमेश्वराच्या (गोः) दिव्य प्रकाश रश्मीच्या (अत्र इह) इथे (चन्द्रभसः) (गृहे) मनरूप चंद्राच्या निवास स्थानात म्हणजे हृदयात (अपीच्यं नाम) आगमनाला उपासक गण (इत्था) सत्य रूपाने (अमन्वत) अनुभवतात. ।। ३।।
Essence
ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशाने चंद्र प्रकाशित होतो. तद्वत परमेश्वराच्या प्रकाशाने स्तुतिकर्त्याचे हृदय प३काशित होतात. ।। ३।।
Subject
पुढील मंत्रात असे वर्णऩ केले आहे की सूर्याने चंद्र णि परमेश्वराने उपासकाचे हृदय प्रकाशित होत आहे -
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ।। ३।।