Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 143

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वत्सः काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
उ꣣पह्वरे꣡ गि꣢री꣣णा꣡ꣳ स꣢ङ्ग꣣मे꣡ च꣢ न꣣दी꣡ना꣢म् । धि꣣या꣡ विप्रो꣢꣯ अजायत ॥१४३॥

उ꣣पह्वरे꣢ । उ꣣प । ह्वरे꣢ । गि꣣रीणाम् । स꣢ङ्गमे꣢ । स꣣म् । गमे꣢ । च꣣ । न꣡दीना꣢म् । धि꣣या꣢ । वि꣡प्रः꣢꣯ । वि । प्रः꣣ । अजायत ॥१४३॥

Mantra without Swara
उपह्वरे गिरीणाꣳ सङ्गमे च नदीनाम् । धिया विप्रो अजायत ॥

उपह्वरे । उप । ह्वरे । गिरीणाम् । सङ्गमे । सम् । गमे । च । नदीनाम् । धिया । विप्रः । वि । प्रः । अजायत ॥१४३॥

Samveda - Mantra Number : 143
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(गिरीणाम्) पर्वतांच्या (उपहृरे) एकांतस्थानी अथवा पर्वताजवळ (नदीनाम्) आणि नद्यांच्या (सड्गमे) संगमस्थानी (धिया) ध्यानाद्वारे (विप्रः) तो सर्वव्यापक आणि मेधावी इन्द्र परमेश्वर (अजायत) प्रकट होतो. ।। ९।।
Essence
तुमचा प्रश्न आहे की तो इन्द्र परमेश्वर कुठे आहे ? यावर आमचे उत्तर असे - तो सर्वव्यापी आहे. त्याचे दर्शन या बाह्य चर्मचक्षूद्वारे होणे संभवनीय नाही. ध्यानाद्वारे आंतरिक चक्षूद्वारे साक्षात्कार रूनच त्याला जाणता येते. शिवाय त्याचे ध्यान कोलाहल गोंगाटाने भरलेल्या वातावरणात करता येत नाही, तर त्याचे ध्यान पर्वतांच्या आणि नद्यांच्या शांत प्रदेशात होणे शक्य आहे. द्यानास अनुकूल अशा प्रदेशातच ध्यान करणाऱ्यांना त्या परमेश्वराचा साक्षात्कार होत असतो. तुमचा दुसरा प्रश्न आहे - त्याची पूजा कोण करू शकतो ? या प्रश्नाचे उत्तरदेखील पहिल्या प्रश्नाच्या उत्तरातच समाविष्ट आहे. त्या निराकार, शरीररहित आणि नेत्र-अगोचर परमेश्वराची पूजा पूर्ववर्णित पद्धतीने म्हणजे ध्यानाद्वारे तो ध्यानी- मनुष्यच करू शकतो. त्या अमूर्त, निराकार ईश्वराची कल्पित मूर्ती तयार करून आणि त्यावर पत्र, पुष्य, जल आदी वाहणारा माणूस त्याचा खरा पूजक नाही, हे लक्षात ठेवा ।। ९।।
आता परमेश्वराची आणि भूपतीची स्तुती करण्याविषयी मनुष्यांना प्रेरणा केली आहे -
Subject
प्रश्न विचारणाऱ्याचा अभिप्राय असा की ज्याअर्थी तो नाही, मग त्याची पूजा तरी कुणी कशी करू शकेल ?