Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 142

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- प्रगाथः काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
क्वा꣢३꣱स्य꣡ वृ꣢ष꣣भो꣡ युवा꣢꣯ तुवि꣣ग्री꣢वो꣣ अ꣡ना꣢नतः । ब्र꣣ह्मा꣡ कस्तꣳ स꣢꣯पर्यति ॥१४२॥

क्व꣢꣯ । स्यः । वृ꣣षभः꣢ । यु꣡वा꣢꣯ । तु꣣विग्री꣡वः꣢ । तु꣣वि । ग्री꣡वः꣢꣯ । अ꣡ना꣢꣯नतः । अन् । आ꣣नतः । ब्रह्मा꣢ । कः । तम् । स꣣पर्यति ॥१४२॥

Mantra without Swara
क्वा३स्य वृषभो युवा तुविग्रीवो अनानतः । ब्रह्मा कस्तꣳ सपर्यति ॥

क्व । स्यः । वृषभः । युवा । तुविग्रीवः । तुवि । ग्रीवः । अनानतः । अन् । आनतः । ब्रह्मा । कः । तम् । सपर्यति ॥१४२॥

Samveda - Mantra Number : 142
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(वृषभः) आनंदाची वृष्टी करणारा, (युवा) नित्य तरुण म्हणजे युवकाप्रमाणे सदा शक्तिशाली असलेला (तुविग्रीवः) प्रलयकाळात संपूर्ण जगाला गिळणारा अर्थात प्रकृतिमध्ये लय करणारा आणि पुष्कळ उपदेश देणारा तसेच (उत्नानतः) शत्रूसमोर कधीही न वाकणारा (स्यः) तो इन्द्र परमेश्वर (क्व) कुठे आहे ? (तुम्ही मला उत्तर सांगा) तसेच (कः) कोण तो (ब्रह्मा) विद्यावृद्ध मनुष्य आहे की जो (तम्) पूर्ववर्णित विशेषणांनी युक्त अशा त्या इन्द्र परमेश्वराची पूजा करतो ? (उत्तर सांगा) ।। ८।।
Essence
तुम्ही म्हणता की या ब्रह्माण्डाचा कुणीतरी एक शासक आहे, तोच कधी सर्व लोकांवर सुखाची वृष्टी करतो, तो कधी न लहान मूल होतो ना कधी म्हातारा होतो, तो नेहमी तरुणच असतो. (सांगा बरे असा कोण आहे ?) तुम्ही म्हणता की त्याला हजार ग्रीवा असून तो प्रलयकाळी सर्व पदार्थांा गिळून टाकतो आणि सृष्टि निर्मिती काळी तोच हजारो लोकांना ज्ञानाचा उपदेश करतो, तो कधी शत्रूसमोर वाकत नाही. उलट त्या शत्रूलाच वाकवतो. आता आम्ही तुम्हाला विचारतो की असा तो आहे कुठे ? जर तो आहे, तर आम्हाला दाखवा. तुम्ही म्हणता की तो पूजनीय आहे. आम्ही विचारतो की कोण तो विद्वान मनुष्य आहे की जो त्या निराकार, अशरीरी, अदृश्य व अश्रव्य सत्तेची पूजा करू शकेल ?