Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 140

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- श्रुतकक्षः आङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
बो꣡ध꣢न्मना꣣ इ꣡द꣢स्तु नो वृत्र꣣हा꣡ भूर्या꣢꣯सुतिः । शृ꣣णो꣡तु꣢ श꣣क्र꣢ आ꣣शि꣡ष꣢म् ॥१४०॥

बो꣡ध꣢꣯न्मनाः । बो꣡ध꣢꣯त् । म꣣नाः । इ꣢त् । अ꣣स्तु । नः । वृत्रहा꣢ । वृ꣣त्र । हा꣢ । भू꣡र्या꣢꣯सुतिः । भू꣡रि꣢꣯ । आ꣣सुतिः । शृणो꣡तु꣢ । श꣣क्रः꣢ । आ꣣शि꣡ष꣢म् । आ꣣ । शि꣡ष꣢꣯म् ॥१४०॥

Mantra without Swara
बोधन्मना इदस्तु नो वृत्रहा भूर्यासुतिः । शृणोतु शक्र आशिषम् ॥

बोधन्मनाः । बोधत् । मनाः । इत् । अस्तु । नः । वृत्रहा । वृत्र । हा । भूर्यासुतिः । भूरि । आसुतिः । शृणोतु । शक्रः । आशिषम् । आ । शिषम् ॥१४०॥

Samveda - Mantra Number : 140
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(वृत्रहा) पापनाशक आणि (भूर्यासुतिः) अत्यंत रसमय तो इन्द्र परमेश्वर (नः) आम्हासाठी (बोधन्मनाः) मन प्रबुद्ध करणारा (इत्)(अस्तु) होवो. तो (शक्रः) शक्तिशाली परमेश्वर (आशिषम्) आमची महत्त्वाकांक्षा (शृणोतु) ऐको, पूर्ण करो ।। ६।।
Essence
जो परमेश्वर दोषहारक, अधमपरजिता, पापविनाशक, आनंदसागर आणि सर्व शक्तिमान आहे, तो आमच्या मनास प्रबुद्ध करून दीर्घायुष्य, समृद्धी, विजय, मोक्ष आदी आमच्या ज्या महत्त्वाकांक्षा आहेत, त्या पूर्ण करोत. ।। ६।।
Subject
पुढील मंत्रात म्हटले आहे की परमेश्वराने आमची प्रार्थना ऐकावी -
Special
या मंत्रात ‘वृत्रहा’ आणि ‘शक्र’ हे दोन शब्द इन्द्र वाचक शब्द म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणून येथे पुनरुक्त वदाभास अलंकार आहे. शब्दांचा यौगिक अर्थ घेतल्यामुळे पुनरुक्तीचा परिहार होतो. ङ्गशृणोतुफमध्ये श्रु धातू पूर्ण करण्याविषयी वापरलेला असल्यामुळे येथे लक्षणा शब्दश्कती आहे, हे जाणावे. (म्हणजे येथे ‘श्रु’ धातू श्रवण करणे या अर्थात वापरलेला नसल्यामुळे लक्षणा शक्तीद्वारे त्याचा अर्थ ‘पूर्ण करणे’ सा आहे.)।। ६।।