Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 138

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- कुसीदी काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
दे꣣वा꣢ना꣣मि꣡दवो꣢꣯ म꣣ह꣡त्तदा वृ꣢꣯णीमहे व꣣य꣢म् । वृ꣡ष्णा꣢म꣣स्म꣡भ्य꣢मू꣣त꣡ये꣢ ॥१३८॥

दे꣣वा꣡ना꣢म् । इत् । अ꣡वः꣢꣯ । म꣣ह꣢त् । तत् । आ । वृ꣣णीमहे । वय꣢म् । वृ꣡ष्णा꣢꣯म् । अ꣣स्म꣡भ्य꣢म् । ऊ꣣त꣡ये꣢ ॥१३८॥

Mantra without Swara
देवानामिदवो महत्तदा वृणीमहे वयम् । वृष्णामस्मभ्यमूतये ॥

देवानाम् । इत् । अवः । महत् । तत् । आ । वृणीमहे । वयम् । वृष्णाम् । अस्मभ्यम् । ऊतये ॥१३८॥

Samveda - Mantra Number : 138
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
प्रथम अर्थ (परमेश्वर पर) परमेश्वर इन्द्र आहे. त्याचे दिव्य सामर्थ्य यालाच देव म्हटले आहे. (देवानाम्) इन्द्र परमेश्वराचे जे दिव्य सामर्थ्य आहे (इत्) त्यांचीच (अवः) सुरक्षा (महत्) सर्वांहून महामवा श्रेष्ठ आहे. (कृष्णाम्) सुखांची वृष्टी करणाऱ्या त्या दिव्य सामर्थ्याचे (तत्) ते संरक्षण (वयम्) आही उपासक गण (ऊतये) आपल्या प्रगतीकरिता (अस्मभ्यम्) आपल्यासाठी (आ वृणीमहे) प्राप्त करीत आहोत.
द्वितीय अर्थ - (विद्वानपर) इन्द्र म्हणजे आचार्य आणि त्यांचे विद्यावान शिष्य हेच देव आहेत. त्या (देवामाम् ) विद्वज्जनांचे (इत्)(अत्रः) शास्त्र ज्ञान (महत्) महान असते. (वृष्णाम्) विद्येची वृष्टी करणाऱ्या (पाऊस पाडणाऱ्या) विद्वानांच्या (तत्) त्या शास्त्रज्ञानाला (वदम्) आम्ही अल्पश्रुत लोक (ऊतये) स्वतःच्या प्रगतीसाठी (अस्मभ्यम्) आपल्याकरितांच (आवृणीमहे) स्वीकार करीत आहोत. ।। ४।।
Essence
इन्द्र या नावाने वेदांमध्ये ज्या परमेश्वराचे कीर्तीमान केले आहे, त्याचे दिव्य सामर्थ्य बहुमूल्य आहे. या सामर्थ्यांचे संरक्षण मिळाल्यास अल्पशक्तिवान माणूसदेखील सर्व विघ्न - संकटांना अपवारित करू शकतो आणि अनेकांनेक दुःख, कष्टादीनी व्यापलेल्या या जगात सुरक्षित राहू शकतो. यामुळे त्या दिव्य सामर्थ्याची सुरक्षा सर्वांनी प्राप्त केली पाहिजे. तसेच विद्वज्जनही देव असतात. त्यांच्या उपदेश ऐकून सर्वांनी ज्ञानार्जनही केले पाहिजे ।। ४।।
Subject
पुढील मंत्रात परमेश्वरापासून प्राप्तव्य रक्षणासाठी व विद्वानांपासून प्राप्तव्य ज्ञानाची प्रार्थना केली आहे -
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे ।। ४।।