Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 133

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- त्रिशोकः काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
आ꣢ घा꣣ ये꣢ अ꣣ग्नि꣢मि꣣न्ध꣡ते꣢ स्तृ꣣ण꣡न्ति꣢ ब꣣र्हि꣡रा꣢नु꣣ष꣢क् । ये꣢षा꣣मि꣢न्द्रो꣣ यु꣢वा꣣ स꣡खा꣢ ॥१३३॥

आ꣢ । घा꣣ । ये꣢ । अ꣣ग्नि꣢म् । इ꣣न्ध꣡ते꣢ । स्तृ꣣ण꣡न्ति꣢ । ब꣣र्हिः꣢ । अ꣣नुष꣢क् । अ꣣नु । स꣢क् । ये꣡षा꣢꣯म् । इ꣡न्द्रः꣢꣯ । यु꣡वा꣢꣯ । स꣡खा꣢꣯ । स । खा꣣ । ॥१३३॥

Mantra without Swara
आ घा ये अग्निमिन्धते स्तृणन्ति बर्हिरानुषक् । येषामिन्द्रो युवा सखा ॥

आ । घा । ये । अग्निम् । इन्धते । स्तृणन्ति । बर्हिः । अनुषक् । अनु । सक् । येषाम् । इन्द्रः । युवा । सखा । स । खा । ॥१३३॥

Samveda - Mantra Number : 133
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(ये) जे लोक (घ) निश्चयाने (अग्निम्) यज्ञाग्नीला, उत्साहाच्या अग्नीला, संकल्प अग्नीला, महत्त्वाकांक्षा - अग्नीला आणि आत्म- अग्नीला (आ इन्धते) प्रदीप्त करतात आणि (वेषाम्) ज्या लोकांच्या (युवा) सदा युवा अर्थात नेहमी सशक्त असणारा (इन्द्रः) पराक्रमशाली परमेश्वर (येषाम्) ज्या लोकांचा (सखा) मित्र होतो, ते लोक (आनुषक्) क्रमशः हळूहळू (बर्हिः) कुशा आदी यज्ञसाधनांचा आणि यशाचा विस्तार करतात म्हणजे ते निरंतर यज्ञकर्मात संलग्न असतात. ।। ९।।
Essence
ज्यांच्या हृदयात अग्नी (उत्साह व कार्यपूर्तीसाठी संकल्परूप अग्नी) ज्वलंत नाही, ते लोक आळशी जगतात. असे निरुद्योगीजन स्वार्थ पूर्तीतदेखील सुस्त असतात, मग परार्थ साधन रूप यज्ञ - कर्म करण्याविषयी तर बोलायलाच नको. पण जे लोक अग्निहोत्राच्या अग्नी प्रज्वलित करून आणि त्यापासून प्रेरणा घेऊन उत्साह, संकल्प व महत्त्वाकांक्षा रूप अग्नी तसेच आत्मबलरूप अग्नी प्रज्वलित ठेवतात तसेच सदा युवा, दुसऱ्यांचे दुःख - दारिद्रद्य दूर करणाऱ्या, शत्रुजयी, सृष्टियज्ञकर्ता, शतक्रतु इन्द्र परमेश्वराला आपला सहायक, मित्र करून घेतात, ते नेहमी मनात स्फूर्ती, कर्मण्यत्व आणि औदार्य भाव धारण करून सदा परोपकार कार्यात निमग्न असतात. ।। ९।।
Subject
परमेश्वराच्या मैत्रीचा आणि अग्नी प्रदीप्त करण्यापासून काय लाभ होतो, पुढील मंत्रात हा विषय -