Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 132

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वसिष्ठो मैत्रावरुणिः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
व꣣य꣡मि꣢न्द्र त्वा꣣य꣢वो꣣ऽभि꣡ प्र नो꣢꣯नुमो वृषन् । वि꣣द्धी꣢ त्वा३꣱स्य꣡ नो꣢ वसो ॥१३२॥

व꣣य꣢म् । इ꣣न्द्र । त्वाय꣡वः꣢ । अ꣣भि꣢ । प्र । नो꣣नुमः । वृषन् । विद्धि꣢ । तु । अ꣣स्य꣢ । नः꣣ । वसो ॥१३२॥

Mantra without Swara
वयमिन्द्र त्वायवोऽभि प्र नोनुमो वृषन् । विद्धी त्वा३स्य नो वसो ॥

वयम् । इन्द्र । त्वायवः । अभि । प्र । नोनुमः । वृषन् । विद्धि । तु । अस्य । नः । वसो ॥१३२॥

Samveda - Mantra Number : 132
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(वृषन्) अभीष्ट सुखांची, शक्तीची आणि धनाची वृष्टी करणाऱ्या (इन्द्र) हे परमैश्वर्यशाली, दुःखविदारक, शत्रुसंहारक परमात्मा (वयम्) आम्ही तुमचे उपासक (त्वायवः) तुम्हाला चाहणारे व तुमच्या प्रेमाच्या वशीभूत होऊन (अग्नि प्र नोनुमः) तुमची वारंवार उत्तम प्रकारे स्तुती करतो. हे (वसो) सर्वांच्या हृदयात बसणाऱ्या (असणारे) वा सर्वांना निवास वा स्थैर्य देणाऱ्या देवा, तुम्ही (अस्य) आण्ही गात असलेल्या या स्तोत्राला (विद्धि) जाणून समजून घ्या. ।। ८।।
Essence
हे इन्द्र, हे परमैश्वर्यशाली, हे परमैश्वर्य प्रदाता, हे विपत्तिविदारक, हे धर्मप्रसारक, हे अधर्मविध्वंसक, हे मित्रसहायक, हे शत्रुुविनाशक, हे आनंदधारा प्रवाह, हे सद्वुणवृष्टिकारक, हे मनोरथ पूर्णकर्ता, हे हृदयस्थ, हे निवासक परमेश्वरा, तुझ्या प्रेमात मग्न झालेले तुझ्या प्राप्तीसाठी उत्सुक असलेले आम्ही तुझे उपासक वारंवार तुझी वंदना करीत आहोत. तुला प्रणाम करीत आहोत, तुझ्या गुणांचे कीर्तन करीत आहोत. आम्ही नतमस्तक होऊन करीत असलेल्या या वंदन, प्रणाम आणि गुणकीर्तनाला तू स्वीकार कर आणि आम्हाला उद्बोधित कर. ।। ८।।
Subject
पुढील मंत्रात स्तोताजन परमेश्वराकडे निवेदन करीत आहे -