Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 131

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- त्रिशोकः काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
अ꣡पि꣢बत्क꣣द्रु꣡वः꣢ सु꣣त꣡मिन्द्रः꣢꣯ स꣣ह꣡स्र꣢बाह्वे । त꣡त्रा꣢ददिष्ट꣣ पौ꣡ꣳस्य꣢म् ॥१३१॥

अ꣡पि꣢꣯बत् । क꣣द्रु꣡वः꣢ । क꣣त् । द्रु꣡वः꣢꣯ । सु꣣त꣢म् । इ꣡न्द्रः꣢꣯ । स꣣ह꣡स्र꣢बाह्वे । स꣣ह꣡स्र꣢ । बा꣣ह्वे । त꣡त्र꣢꣯ । अ꣣ददिष्ट । पौँ꣡स्य꣢꣯म् । ॥१३१॥

Mantra without Swara
अपिबत्कद्रुवः सुतमिन्द्रः सहस्रबाह्वे । तत्राददिष्ट पौꣳस्यम् ॥

अपिबत् । कद्रुवः । कत् । द्रुवः । सुतम् । इन्द्रः । सहस्रबाह्वे । सहस्र । बाह्वे । तत्र । अददिष्ट । पौँस्यम् । ॥१३१॥

Samveda - Mantra Number : 131
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(इन्द्रः) विघ्नविदारक, बलदायक परमेश्वर (सहस्त्रबाहेर) काम, क्रोध आदी हजार भुजा अणाऱ्या पापरूप दैत्याचा वध करण्यासाठी (कद्रुवः) क्रियाशील वा स्तुतिशील मनुष्याने दिलेला (सुतम्) भक्तिरूप सोमरस (आदिबत्) पीतो (पापनाशासाठी उपासकाला शक्ती देतो) आणि (वत्र) त्या मनुष्याला (पौंस्यम्) बळ, पौरुष (अददिष्ट) प्रदान करतो. ।। ७।।
Essence
माणूस अत्यंत निर्बल आहे. काम- क्रोध आदी सहस्त्र भुजा असणारा पापरूप दैत्य त्याला आपल्या निमंत्रणात घेऊ इच्छितो. अशा वेळी माणसाने क्रियावान व पुरुषार्थी होऊन त्या भक्तवत्सल, विपत्तिनाशक, शक्तिदायक परमेश्वराची उपासना करून त्यापासून शक्ती प्राप्त करून पापनाम सहस्त्र बाहु शत्रभूचा पराभव करावा. ।। ७।।
या मंत्राचा अर्थ करताना अनेक भाष्यकारांनी आपल्या कल्पनेनेच कद्रु या नावाची भार्या, तर कोणी कद्रु म्हणजे यजमान कोणी कद्रु नाम ऋषी अथवा कोणी कद्रू नामक राजा असा अर्थ केला आहे. त्या सर्वांची मते एकमेकाला छेद देणाऱ्या असल्यामुळे ग्राह्य नाहीत. वास्तविक पाहता वेदांमध्ये लौकिक इतिहास शोधणे म्हणजे सशाचे शिंग शोधण्याप्रमाणे अशक्य कार्य आहे. निरर्थक प्रयत्न आहे. वेदांचा सत्य अर्थ कळण्यासाठी नैरुक्त पद्धतीच श्रेयस्कर व उपयोगी आहे. ।। ७।।
Subject
उपासकाला वा प्रशंसकाला ईश्वर भक्तीने काय मिळते, याविषयी -