Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 128

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- श्रुतकक्षः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
मा꣡ न꣢ इन्द्रा꣣भ्या꣢३꣱दि꣢शः꣣ सू꣡रो꣢ अ꣣क्तु꣡ष्वा य꣢꣯मत् । त्वा꣢ यु꣣जा꣡ व꣢नेम꣣ त꣢त् ॥१२८॥

मा ꣢ । नः꣣ । इन्द्र । अभि꣢ । आ꣣दि꣡शः꣢ । आ꣣ । दि꣡शः꣢꣯ । सूरः꣢꣯ । अ꣣क्तु꣡षु꣢ । आ । य꣣मत् । त्वा꣢ । यु꣣जा꣢ । व꣣नेम । त꣢त् ॥१२८॥

Mantra without Swara
मा न इन्द्राभ्या३दिशः सूरो अक्तुष्वा यमत् । त्वा युजा वनेम तत् ॥

मा । नः । इन्द्र । अभि । आदिशः । आ । दिशः । सूरः । अक्तुषु । आ । यमत् । त्वा । युजा । वनेम । तत् ॥१२८॥

Samveda - Mantra Number : 128
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (इन्द्र) परमवीर परमात्मा अथवा हे राजा, (आदिशः) कोणत्याही दिशेने (सूरः) मोका साधून हळूच शिरणारा काम, क्रोध आदी राक्षस गण अथवा चोरांची टोळी यांनी (अक्तुषु) अज्ञानरूप रात्रीमध्ये अथवा अंधाऱ्या रात्रीत (नः) आम्हावार वा आमच्या घरावर (मा अभि आ यमत्) आक्रमण करू नये (अशी कृपा करावा हे राजा, अशी व्यवस्था करा) त्या काम- क्रोधादी राक्षसांनी वा चोर- दरोडोखोरांनी यदा कदाचित आक्रमण केले, तर (त्वा) तुमच्यासारख्या (यजा)सहायकाच्या साह्याने आम्ही (तत्) त्या राक्षसांना व चोरांना (वनेम) नष्ट करू शकू वा त्यांचे समूळ उच्चाटन करण्यात यशस्वी होऊ, असे करा. ।। ४।।
Essence
अज्ञानीधकारात सापडलेल्या या अंधाऱ्या रात्रीत झोपलेल्या आम्हा (नागरिकांवर) तसेच आम्हास बेसावध पाहून काम- क्रोध आदी मानसिक शत्रू अथवा चोर- दरेडोखोर आमच्यावर आक्रमण करून आम्हाला नष्ट करू पाहतील, तर आम्ही परमेश्वराच्या साह्याने मानसिक शत्रूंचा व राजाच्या साह्याने चोर आदी दुष्टांचा पूर्णपणे नायनाट करू ।। ४।।
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ।। ४।।