Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 126

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- सुकक्षश्रुतकक्षौ Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
य꣢द꣣द्य꣡ कच्च꣢꣯ वृत्रहन्नु꣣द꣡गा꣢ अ꣣भि꣡ सू꣢र्य । स꣢र्वं꣣ त꣡दि꣢न्द्र ते꣣ व꣡शे꣢ ॥१२६॥

य꣢त् । अ꣣द्य꣢ । अ꣣ । द्य꣢ । कत् । च꣣ । वृत्रहन् । वृत्र । हन् । उद꣡गाः꣢ । उ꣣त् । अ꣡गाः꣢꣯ । अ꣣भि꣢ । सू꣣र्य । स꣡र्व꣢꣯म् । तत् । इ꣣न्द्र । ते । व꣡शे꣢꣯ ॥१२६॥

Mantra without Swara
यदद्य कच्च वृत्रहन्नुदगा अभि सूर्य । सर्वं तदिन्द्र ते वशे ॥

यत् । अद्य । अ । द्य । कत् । च । वृत्रहन् । वृत्र । हन् । उदगाः । उत् । अगाः । अभि । सूर्य । सर्वम् । तत् । इन्द्र । ते । वशे ॥१२६॥

Samveda - Mantra Number : 126
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(वत्रहन्) अविद्या, पाप, दुराचार आदी जे दुर्गुण धर्माच्या प्रगतीत अडथळे आणतात, त्यांचा विनाश करणारे (सूर्य) प्रकाशनात प्रकाशदाता (इन्द्र) हे परमैश्वर्यवान् परमेश्वर (अद्य) आज तुम्ही (यत् क् च) ज्या कोणा मनुष्याला अथवा माझ्या मन, बुद्धी, प्राण, इंद्रिये आदींना (अभि) लक्ष्य करून (उदगाः) उदित होता (माझ्या हृदयात जागृत वा अनुभूत होता) (सर्वंतत्) ती सर्व माणसे अथवा ते माझे मन, बुद्धी आदी (ते) तुझ्या (वशे) अधिकाराता वा तुझ्या वशी होतात. ।। २।।
Essence
ज्याप्रमाणे आकाशातील सूर्य कोणत्याही पदार्थाप्रत उदित होतो (सर्वांनाच सारखेपणाने प्रकाश देतो) आणि सर्व पदार्थ त्या प्रकाशाने उजळून निघतात, तसेच परमात्म रूप सूर्य ज्याच्या अंतःकरणात उदित होतो, तो मनुष्य परमेश्वराच्या दिव्य प्रकाशाने (प्रेरणेने) परिपूर्ण होऊन पूर्णपणे त्याच्या प्रभावाखाली येतो. ।। २।।