Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 122

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- गोषूक्त्यश्वसूक्तिनौ काण्वायनौ Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
य꣡दि꣢न्द्रा꣣हं꣢꣫ यथा꣣ त्व꣡मीशी꣢꣯य꣣ व꣢स्व꣣ ए꣢क꣣ इ꣢त् । स्तो꣣ता꣢ मे꣣ गो꣡स꣢खा स्यात् ॥१२२॥

य꣢त् । इ꣣न्द्र । अह꣢म् । य꣡था꣢꣯ । त्वम् । ई꣡शी꣢꣯य । व꣡स्वः꣢꣯ । ए꣡कः꣢ । इत् । स्तो꣣ता꣢ । मे꣣ । गो꣡सखा꣢꣯ । गो । स꣣खा । स्यात् ॥१२२॥

Mantra without Swara
यदिन्द्राहं यथा त्वमीशीय वस्व एक इत् । स्तोता मे गोसखा स्यात् ॥

यत् । इन्द्र । अहम् । यथा । त्वम् । ईशीय । वस्वः । एकः । इत् । स्तोता । मे । गोसखा । गो । सखा । स्यात् ॥१२२॥

Samveda - Mantra Number : 122
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (इन्द्र) परमेश्वर, (यत्) जर (अहम्) मी, तुमचा उपासक (यथा त्वम्) जसे तुम्ही आहात, तसा (विस्वः) विद्याधनाचा अथवा भौतिक धनाचा (एकः इत्) एक मात्र (वा पूर्णतः) (ईशीय) स्वामी होऊ शकेन, तर (मे) माझा (स्तोता) प्रशंसक शिष्य वा सेवक (सोसखा) वेदवाणीचा पंडित अथवा गौ आदी पशुधनाचा स्वामी (स्यात्) अवश्य होईल. ।। ८।।
Essence
परमेश्वर हाच विद्या धनाचा आणि ऐहिक धनसंपदेचा एकमात्र परम अधीश्वर आहे. त्याने आपले विद्याधन आम्हाला वेद ज्ञानाच्या रूपाने आणि आपले भौतिक धन सुवर्ण, चांदी, सूर्य, वायू, बल, फळे, मुळे आदींच्या रूपाने आम्हास दिले आहे. त्याचप्रमाणे मीही जर परमेस्वर कृपेने विद्यादी धनाचा व भौतिक धनाचा अधिपती होईन, तर मीही आपल्या प्रशंसक शिष्यांना विद्यादान करून त्यांना वेळ आदी शास्त्रांचा पंडित करीन आणि सेवकांना धन देऊन गौ आदी पशु धनाने वा ऐश्वर्याने अत्यंत समृद्ध करीन. ।। ८।।
Subject
पुढील मंत्रात हे म्हटले आहे की ज्या मी परमेश्वराप्रमाणे धनपती झालो, तर काय करीन -