Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 120

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- देवजामय इन्द्रमातर ऋषिकाः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
त्व꣡मि꣢न्द्र꣣ ब꣢ला꣣द꣢धि꣣ स꣡ह꣢सो जा꣣त꣡ ओज꣢꣯सः । त्वꣳ सन्वृ꣢꣯ष꣣न्वृ꣡षेद꣢꣯सि ॥१२०॥

त्व꣢म् । इ꣣न्द्र । ब꣡ला꣢꣯त् । अ꣡धि꣢꣯ । स꣡ह꣢꣯सः । जा꣣तः꣢ । ओ꣡ज꣢꣯सः । त्व꣢म् । सन् । वृ꣣षन् । वृ꣡षा꣢꣯ । इत् । अ꣣सि ॥१२०॥

Mantra without Swara
त्वमिन्द्र बलादधि सहसो जात ओजसः । त्वꣳ सन्वृषन्वृषेदसि ॥

त्वम् । इन्द्र । बलात् । अधि । सहसः । जातः । ओजसः । त्वम् । सन् । वृषन् । वृषा । इत् । असि ॥१२०॥

Samveda - Mantra Number : 120
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (इन्द्र) परमवीर परमैश्वर्यवान परमात्मन् / राजन् (बलाल्) अत्याचारीजनांच्या विनाशासाठी आणि सज्जनांच्या रक्षण धारणासाठी आपणाकडे असलेल्या बळामुळे (सहसः) मनोबलामुळे तसेच (ओजसः) आत्मशक्तीमुळे (त्वम्) आपण (अधिजातः) प्रख्यात आहात. (सन्) श्रेष्ठ असे. हे (वृषन्) सुख वर्षक (त्वम्) (वृष्स इत्) आपण जणू वृष्टिकर्ता मेघच (असि) आहात. ।। ६।।
Essence
परमेश्वराची आणि राजाची राक्षस वध रूप अनेक कार्यें स्दिध आहेत तसे पृथ्वी, सूर्य आदी लोकांच्या धारणामुळे परमेश्वर आणि राष्ट्रधारण रूप कार्यामुळे राजा प्रसिद्ध आहे. त्या दोघांचे मनोबल व आत्मबलदेखील अनुपम आहे. दोघांचे ‘वृषा’ मेघ हे नाव सार्थक आहे कारण ते ढगांप्रमाणे सर्वांवर सुखाची वृष्टी करतात. अशा अत्यंत महिमाशाली परमेश्वराचे आणि राजाचे आम्ही रात्रं दिवस अभिनंदन केले पाहिजे. ।। ६।।
Subject
पुढील मंत्रात इन्द्र नावाने परमेश्वराचा व राजाचा महिमा वर्णित केला आहे -
Special
या मंत्रात अर्थश्लेषालंकार आहे. इन्द्रावर वर्षक मेघ असण्याचा आरोप केल्यामुळे रूपक अलंकारही आहे. ‘वृषे वृषे’मध्ये छेकानुप्रास आहे. ।। ६।।