Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 117

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- हर्यतः प्रागाथः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
गा꣢व꣣ उ꣡प꣢ वदाव꣣टे꣢ म꣣हि꣢ य꣣ज्ञ꣡स्य꣢ र꣣प्सु꣡दा꣢ । उ꣣भा꣡ कर्णा꣢꣯ हिर꣣ण्य꣡या꣢ ॥११७॥

गा꣡वः꣢꣯ । उ꣡प꣢꣯ । व꣣द । अवटे꣢ । म꣣ही꣡इति꣢ । य꣣ज्ञ꣡स्य꣢ । र꣣प्सु꣡दा꣢ । र꣣प्सु꣢ । दा꣣ । उभा꣢ । क꣡र्णा꣢꣯ । हि꣣रण्य꣡या꣢ ॥११७॥

Mantra without Swara
गाव उप वदावटे महि यज्ञस्य रप्सुदा । उभा कर्णा हिरण्यया ॥

गावः । उप । वद । अवटे । महीइति । यज्ञस्य । रप्सुदा । रप्सु । दा । उभा । कर्णा । हिरण्यया ॥११७॥

Samveda - Mantra Number : 117
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (गावः) स्तोताजनहो, तुम्ही (अवटे) जो रसांच्या विहिरीप्रमाणे रसपरिपूर्ण असा परमेश्वर आहे, त्याचे (उप वद) महिमागान करता (मही) ही महान पृथ्वी व विशाल आकाश (यज्ञस्म) त्या पूजनीय परमेश्वराचे (रप्सुदा) स्वरूप प्रकाशित करणारे (म्हणजे त्या विस्तृत्वाची व महानतेची किंचित कल्पना देणारे) आहेत. (उभा) हिरण्यया) सूर्य व चंद्र दोन्ही या धरित्री व आकाशाच्या (कर्णा) कर्ण- कुंडलाप्रमाणे आहेत. ।। ३।।
Essence
जो परमेश्वर दया, वीरत्व, आनंद आदी रसांच्या विहिरीप्रमाणे आहे, सर्व मनुष्यांनी आपल्या वाणीने त्याचा महिमा अवश्य गायिला पाहिजे. जरी हे निराकार असल्यामुळे गोरा, हिरवा, पिवळा, आदी रंग रूपाचा नाही, तरीही त्याचे बक्त त्याला पृथ्वी आणि आकाशाच्या अनेकानेक चित्र- विचित्र पदार्थांमध्ये त्याचे रूप पाहतात आणि अशी भावना करतात की जणू त्या परमेश्वराच्या दीप्तीनेच हे सर्व दीप्तिमान आहेत. यामुळेच धरित्री व आकाशाला त्याच्या स्वरूपाचे प्रकाशक असे म्हटले जाते. ।। ३।।
Subject
पुढील मंत्रात स्तोताजनांना प्रेरणा केली आहे -
Special
या मंत्रात ‘सोनेरी सूर्य- चंद्र जणू कर्म- कुंडल आहेतफ या कथनात व्यदव्य उत्पेक्षा अलंकार आहे. कर्ण- कुंडलाच्या अर्थाने ‘कर्णो’ शब्दाच्या प्रयोगात ‘लक्षणा’ असून इन्द्रावर कूपाचा आरोप असल्यामुळे रूपक अलंकार आहे.