Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 114

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- विश्वमना वैयश्वः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
य꣡द्वा उ꣢꣯ वि꣣श्प꣡तिः꣢ शि꣣तः꣡ सुप्री꣢꣯तो꣣ म꣡नु꣢षो वि꣣शे꣢ । वि꣢꣫श्वेद꣣ग्निः꣢꣫ प्रति꣣ र꣡क्षा꣢ꣳसि सेधति ॥११४॥

य꣢द् । वै । उ꣣ । विश्प꣡तिः꣢ । शि꣣तः꣢ । सु꣡प्री꣢꣯तः । सु । प्री꣣तः म꣡नु꣢꣯षः । वि꣣शे꣢ । वि꣡श्वा꣢꣯ । इत् । अ꣣ग्निः꣢ । प्र꣡ति꣢꣯ । रक्षाँ꣢꣯सि । से꣣धति ॥११४॥

Mantra without Swara
यद्वा उ विश्पतिः शितः सुप्रीतो मनुषो विशे । विश्वेदग्निः प्रति रक्षाꣳसि सेधति ॥

यद् । वै । उ । विश्पतिः । शितः । सुप्रीतः । सु । प्रीतः मनुषः । विशे । विश्वा । इत् । अग्निः । प्रति । रक्षाँसि । सेधति ॥११४॥

Samveda - Mantra Number : 114
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 12;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(यत् वै ३) जेव्हा (विश्पतिः) प्रजापालक (अग्निः) यज्ञाग्नी, अतिथी, आचार्य, राजा अथवा परमेश्वर, (शितः) हवि (क्रमशः - हव्य पदार्थ, अन्नादी सत्कार, विनय, आज्ञापालन व उपासना) प्राप्त करून तीव्र होतात, उद्बोधित व उत्साहित होतात आणि (मनुषः) सत्कारादी कर्म करणाऱ्या मनुष्याच्या (विशे) (क्रमशः) यज्ञशाळा, स्वगृह, गुरूकुलरूप गृह, राष्ट्र गृह वा हृदय गृह यामध्ये (सुप्रीतः) चांगल्या प्रकारे तृप्त होतात, तेव्हा (विश्वा इत्) सर्व (रक्षांसि) अविद्या, राग, दुराचार, दुर्गुण आदी राक्षसांना तसेच बाह्य शत्रूंना (प्रतिसेधति) दूर सारून टाकतात. ।। ८।।
Essence
ज्याप्रमाणए घृतादींच्या आहुतीमुळे तीव्र व सुतृप्त झालेला यज्ञाग्नी रोगरूण राक्षसांचा विनाश करतो अथवा जसे घरात मिळालेल्या सत्कारामुळे विद्वान अतिथी त्या गृहस्थाच्या सर्व अविद्या आदी राक्षसांचा विनाश करतो अथवा जसे शिष्यांनी केलेल्या सेवा शुश्रूषेमुळे व व्रत पालनामुळे वश झालेला वा प्रसन्न झालेला आचार्य त्याच्या (स्वभावातील, बुद्धी व मनातील सर्व दोष दूर करतो अथवा जसे प्रजाजनांच्या आचरण आणि करदान आदी आज्ञा पालन कार्यामुळे संतुष्ट झालेला राजा प्रजाजनांवरील संकटादींना दूर करतो, तसेच सपर्पण रूप व उपासना रूप हवीने सुप्रसन्न झालेला परमात्मा उपासकांच्या सर्व विघ्न - संकटे आणि काम, क्रोधादी राक्षसांचा समूळ नाश करतो. ।। ८।।
या दशतीमध्ये परमेश्वराच्या मैत्रीचा सुपरिणाम सांगत त्याची स्तुती करण्याची प्रेरणा केली आहे, त्याला तेव प्रदान करण्याची, राक्षस आदी विघ्न बाधांच्या निवारणाची प्रार्थना केली आहे आणि अग्नी नावाने यज्ञाग्नी, अतिथी, आचार्य, राजा आदींच्या चरित्राचे वर्णन केले आहे. यामुळे या दशतीच्या विषयांचा संदर्भ यापूर्वीच्या दशतीच्या विषयांसी आहे, असे जाणावे.।।
Subject
पुढील मंत्रात वर्णन आहे की यज्ञाग्नी, अतिथी, आचार्य, राजा आणि परमेश्वर मनुष्यांवर काय उपकार करतात -
Special
या मंत्रात अर्थश्लेष अलंकार आहे. ।। ८।।