Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 113

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- सौभरि: काण्व: Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
त꣡द꣢ग्ने द्यु꣣म्न꣡मा भ꣢꣯र꣣ य꣢त्सा꣣सा꣢हा꣣ स꣡द꣢ने꣣ कं꣡ चि꣢द꣣त्रि꣡ण꣢म् । म꣣न्युं꣡ जन꣢꣯स्य दू꣣꣬ढ्य꣢꣯म् ॥११३॥

त꣢त् । अ꣣ग्ने । द्युम्न꣢म् । आ । भ꣣र । य꣢त् । सा꣣सा꣡ह꣢ । स꣡द꣢꣯ने । कम् । चि꣣त् । अत्रि꣡ण꣢म् । म꣣न्यु꣢म् । ज꣡न꣢꣯स्य । दू꣣ढ्य꣢꣯म् ॥११३॥

Mantra without Swara
तदग्ने द्युम्नमा भर यत्सासाहा सदने कं चिदत्रिणम् । मन्युं जनस्य दूढ्यम् ॥

तत् । अग्ने । द्युम्नम् । आ । भर । यत् । सासाह । सदने । कम् । चित् । अत्रिणम् । मन्युम् । जनस्य । दूढ्यम् ॥११३॥

Samveda - Mantra Number : 113
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 12;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (अग्ने) तेजस्वी परमात्मन् आपण (तत्) ते (घुम्नम्) तेज (आभर) आम्हाला प्रदान करा (यत्) की जे (सदने) आमच्या हृदयरूप गृहात आणि राष्ट्ररूप सदनात (कंचित्) कोणत्याही प्रकारच्या (अत्रिणम्) भक्षक पापरूप राक्षसांना अथवा पापी मनुष्याला आणि जनस्य) दुष्ट माणसाच्या (दृष्यम्) दुर्बुद्धीकारी (मन्युम्) क्रोधाला (सासाह) नष्ट करू शकते (आपण आम्हाला ते दीप्तिमान तेज दिले, तर त्याद्वारे आम्ही पाप, दुर्बुद्धी व हिंसकाला निस्तेज करू शकतो.) ।। ७।।
Essence
पापरूप राक्षस मनुष्याच्या हृदयरूप सदनाला विकृत करू पाहतात, तसेच भ्रष्टाचारी पापी लोक राष्ट्र रूप - भवनाला उद्ध्वस्त करू पाहतात. तसेच क्रोध हादेखील मनुष्याचा व राष्ट्राचा महान शत्रू आहे. क्रोधामुळे प्रजानन आणि राज्याधिकारी सह्दयत्व सोडून नरपिशाच होतात. परमेश्वराच्या प्रेरणेने मनुष्यांनी असे तेज धारण करावे की ज्याने सर्व पाप विचार, पापीजन आणि क्रोध विनष्ट होतील, अशा रीतीने सर्वांनी आपले हृदय, जनृहृदय आणि राष्ट्र हृदय पवित्र करावे.
Subject
पुढील मंत्रात परमेश्वराकडे तेज देण्याची प्रार्थना केली आहे -