Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 11

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- आयुङ्क्ष्वाहिः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
न꣡म꣢स्ते अग्न꣣ ओ꣡ज꣢से गृ꣣ण꣡न्ति꣢ देव कृ꣣ष्ट꣡यः꣢ । अ꣡मै꣢र꣣मि꣡त्र꣢मर्दय ॥११॥

न꣡मः꣢꣯ । ते꣣ । अग्ने । ओ꣡ज꣢꣯से । गृ꣣ण꣡न्ति꣢ । दे꣣व । कृष्ट꣡यः꣢ । अ꣡मैः꣢꣯ । अ꣣मि꣡त्र꣢म् । अ꣣ । मि꣡त्र꣢꣯म् । अ꣣र्दय ॥११॥

Mantra without Swara
नमस्ते अग्न ओजसे गृणन्ति देव कृष्टयः । अमैरमित्रमर्दय ॥

नमः । ते । अग्ने । ओजसे । गृणन्ति । देव । कृष्टयः । अमैः । अमित्रम् । अ । मित्रम् । अर्दय ॥११॥

Samveda - Mantra Number : 11
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (देव) ज्योतिर्मय, विधादी ज्योतिप्रदायक (अग्ने) लोकनायक जगदीश्वर अथवा हे राजन (कृष्टयः) मनुष्य तुमचे उपासक / तुमचे प्रजाजन) (ते) तुमच्याकडून (ओजसे) शक्ती प्राप्त करण्यासाठी (नम:) नमस्कारयुक्त वचन (गृणन्ति) उच्चारत आहेत म्हणजे तुमच्या शकतीची वारंवार प्रशंसा करीत आहेत. तुम्ही (अमै:) त्या आपल्या शक्तीने (अमित्रम्) शत्रूला (अर्दय) नष्ट करा. ।।१।।
Essence
हे जगदीश्वर तथा हे राजन्, आपले बळ अतिमहान आहे. त्या बळानेच आपण निःसहायजनांची रक्षा करता. आपल्या त्या शक्तीपुढे मोठमोठ्या गविष्ठ लोकांचा दर्प खंड खंड होतो. आपण आमच्या अध्यात्ममार्गात विघ्न, बाधा उपस्थित करणाऱ्या काम, क्रोध आदी षड्रिपूंना तसेच आमच्या सांसारिक जीवनात अडचणी निर्माण करणाऱ्या मानव शत्रूंना आपल्या त्या महान शक्तीने समूळ उच्छिन्न करून टाका, ज्यामुळे आम्ही शत्रुरहित होऊन आत्मिक राज्य आणि बाह्य स्वराज्याचा निश्चिंत होऊन उपभोग घेऊ शकू. कोणत्या गुणांनीयुक्त परमात्म्याची मी स्तुती करतो, हे पुढील मंत्रात सांगतात. - -
Subject
प्रथम मंत्रात परमात्म्याची व राजाची स्तुती करीत त्यांना प्रार्थना करीत आहेत -
Special
या मंत्रात अर्थश्लेषालंकार आहे. ॥१॥