Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 104

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- विश्वमना वैयश्वः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
न꣡ तस्य꣢꣯ मा꣣य꣡या꣢ च꣣ न꣢ रि꣣पु꣡री꣢शीत꣣ म꣡र्त्यः꣢ । यो꣢ अ꣣ग्न꣡ये꣢ द꣣दा꣡श꣢ ह꣣व्य꣡दा꣢तये ॥१०४॥

न꣢ । त꣡स्य꣢꣯ । मा꣣य꣡या꣢ । च꣣ । न꣢ । रि꣣पुः꣢ । ई꣣शीत । म꣡र्त्यः꣢꣯ । यः । अ꣣ग्न꣡ये꣢ । द꣣दा꣡श꣢ । ह꣣व्य꣡दा꣢तये । ह꣣व्य꣢ । दा꣣तये ॥१०४॥

Mantra without Swara
न तस्य मायया च न रिपुरीशीत मर्त्यः । यो अग्नये ददाश हव्यदातये ॥

न । तस्य । मायया । च । न । रिपुः । ईशीत । मर्त्यः । यः । अग्नये । ददाश । हव्यदातये । हव्य । दातये ॥१०४॥

Samveda - Mantra Number : 104
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 11;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(मायया च न) कपटाने वा धोका देऊन देखील (तस्य) त्या परमेश्वराच्या उपासकाला (मर्व्यः) कोणी मानव (रिपुः) शत्रू (न ईशीत) वशीभूत करू शकत नाही (यः) की जो उपासक (हव्य दातये) देय पराक्रम, विजय आदी यश देणाऱ्या (अग्नये) परमेश्वरासाठी (दयाश) आत्म समर्पणरूप हवी प्रदान करतो. ।। ८।।
Essence
विविध विघ्ने आणि संकटांच्या तडाख्यात सापडलेल्या या संसारात अनेक मानव - शत्रू विद्वेष रूप विषाने लिप्त होऊन सज्जनांना लुटण्याचा, फसविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना जाळण्याचे वा ठार मारण्याचे प्रयत्न करतात, पण जे लोक परमेश्वर चरणी आत्मसमर्पण करून त्याला शत्रू- पराजयासाठी शक्ती देण्याची याचना करतात, त्या उपासकांना परमेश्वर पुरुषार्थात उद्युक्त करून विजयी होण्याकरिता एवढे समर्त बनवितो की मोठ्या संख्येने असलेले बली शत्रूदेखील पराक्रमाने वा मायावी शक्तीने त्यांना पराभूत वा वशीभूत करू शकत नाहीत. ।। ८।।
Subject
आता त्या परमात्म रूप अग्नीला हवी दिल्याने काय लाभ प्राप्त होतो, याविषयी वर्णन केले आहे -