Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 101

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- त्रित आप्त्यः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
ज꣣ज्ञानः꣢ स꣣प्त꣢ मा꣣तृ꣡भि꣢र्मे꣣धा꣡माशा꣢꣯सत श्रि꣣ये꣢ । अ꣣यं꣢ ध्रु꣣वो꣡ र꣢यी꣣णां꣡ चि꣢केत꣣दा꣢ ॥१०१॥

ज꣣ज्ञानः꣢ । स꣣प्त꣢ । मा꣣तृ꣡भिः꣢ । मे꣣धा꣢म् । आ । अ꣣शासत । श्रिये꣢ । अ꣣य꣢म् । ध्रु꣣वः꣢ । र꣣यीणा꣢म् । चि꣣केतत् । आ꣢ ॥१०१॥

Mantra without Swara
जज्ञानः सप्त मातृभिर्मेधामाशासत श्रिये । अयं ध्रुवो रयीणां चिकेतदा ॥

जज्ञानः । सप्त । मातृभिः । मेधाम् । आ । अशासत । श्रिये । अयम् । ध्रुवः । रयीणाम् । चिकेतत् । आ ॥१०१॥

Samveda - Mantra Number : 101
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 11;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
पवमान सोम अर्थात चिवशोधक परमात्मा (सप्त) सात (मातृभिः) मातेप्रमाणे गायत्री आदी छंदांनी समृद्ध अशा वेदवाणीद्वारे (जज्ञान) उपासकाच्या हृदयात प्रादुर्भूत होऊन त्याला (श्रिये) संपदा प्राप्त्यर्थ (मेघाम्) धारणावली बुद्धी (आ अशासत) प्रदान करतो, ज्या बुद्धीमुळे (ध्रुव) स्थितप्रज्ञ होऊन (अयम्) हा उपासक (रयीणाम्) श्रेष्ठ आध्यात्मिक संपदा (आ चिकेतत्) प्राप्त करू शकतो. ।। २।।
Essence
गायत्री आदी सात छंदांमध्ये निबद्द अशा वेदवाणीच्या गायनाने परमेश्वराचे सान्निध्य प्राप्त केलेल्या योगीजनाची ऋतम्भरा प्रज्ञा जागृत होते आणि तिच्या माध्यमातून योगी मनुष्याला सर्व आध्यात्मिक संपदा प्राप्त होते. ।। ५।।
Subject
पुढील मंत्राची देवता पवमान असून त्याच्या कल्याणकारितेचे वर्णन केले आहे.