Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 417

1875 Mantra
Devata- विश्वेदेवाः Rishi- त्रित आप्त्यः Chhand- पङ्क्तिः Swara- पञ्चमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
च꣣न्द्र꣡मा꣢ अ꣣प्स्वा꣢३꣱न्त꣡रा सु꣢꣯प꣣र्णो꣡ धा꣢वते दि꣣वि꣢ । न꣡ वो꣢ हिरण्यनेमयः प꣣दं꣡ वि꣢न्दन्ति विद्युतो वि꣣त्तं꣡ मे꣢ अ꣣स्य꣡ रो꣢दसी ॥४१७॥

च꣣न्द्र꣡माः꣢ । च꣣न्द्र꣢ । माः꣣ । अप्सु꣢ । अ꣣न्तः꣢ । आ । सु꣣पर्णः꣢ । सु꣣ । पर्णः꣢ । धा꣣वते । दिवि꣢ । न । वः꣣ । हिरण्यनेमयः । हिरण्य । नेमयः । पद꣢म् । वि꣣न्दन्ति । विद्युतः । वि । द्युतः । वित्त꣢म् । मे꣣ । अस्य꣢ । रो꣣दसीइ꣡ति꣢ ॥४१७॥

Mantra without Swara
चन्द्रमा अप्स्वा३न्तरा सुपर्णो धावते दिवि । न वो हिरण्यनेमयः पदं विन्दन्ति विद्युतो वित्तं मे अस्य रोदसी ॥

चन्द्रमाः । चन्द्र । माः । अप्सु । अन्तः । आ । सुपर्णः । सु । पर्णः । धावते । दिवि । न । वः । हिरण्यनेमयः । हिरण्य । नेमयः । पदम् । विन्दन्ति । विद्युतः । वि । द्युतः । वित्तम् । मे । अस्य । रोदसीइति ॥४१७॥

Samveda - Mantra Number : 417
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 1; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 7;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
माणसांनी प्राकृतिक पदार्थांची गती, प्रकाश इत्यादीविषयक ज्ञानानेही संतोष करता कामा नये तर ज्याने हे पदार्थ उत्पन्न केलेले आहेत त्यालाही जाणले पाहिजे. त्यानेच गती, प्रकाश इत्यादी प्रदान केलेले आहे व त्यांची व्यवस्था करणाराही तोच आहे. ॥९॥
Footnote
या ऋचेच्या व्याख्येत विवरणकार माधवने त्रितविषयक तोच इतिहास लिहिलेला आहे, जो पूर्व संख्या ३६८ च्या मंत्रात प्रदर्शित केलेला आहे. भरत स्वामीने भिन्न इतिहास दर्शविलेला आहे - एकत, द्विती व त्रित हे तीन आप्तचे पुत्र होते, ते जेव्हा यज्ञ करवून गाई घेऊन परत येत होते तेव्हा वाळवंटात तृषार्त होऊन एका विहिरीला पाहून तेथे थांबले व विहिरीत उतरण्याचा विचार करू लागले. प्रथम त्रित विहिरीत उतरला, उरलेल्या दोघांना बाहेरच पाणी मिळाले व ते पाणी पिऊन तृप्त झाले व विहिरीला एका चक्राने बंद करून गाई घेऊन निघून गेले. इकडे विहिरीत पडलेला त्रित देवांची स्तुती करू लागला. ती विहीर निर्जल होती, ज्यात त्रित तहानेने व्याकूळ होऊन उतरला होता. तेथे पडल्या पडल्या तो चंद्राला पाहून विलाप करू लागला की चंद्र पाण्यात स्थित होऊन आकाशात पळत आहे इत्यादी. कोणत्याही प्रकारे माझी तहान भागली पाहिजे त्यासाठी त्याचा विलाप होता. तो म्हणत होता की हे आकाश व भूमी तुम्ही माझ्या संकटाला जाणा. माधव व भरत स्वामीच्या इतिहासात अंतर आहे. त्यातच त्यांचे कल्पनाप्रसूत असल्याचे प्रमाण आहे ॥