Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 368

1875 Mantra
Devata- विश्वेदेवाः Rishi- त्रित आप्त्यः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
अ꣣मी꣡ ये दे꣢꣯वा꣣ स्थ꣢न꣣ म꣢ध्य꣣ आ꣡ रो꣢च꣣ने꣢ दि꣣वः꣢ । क꣡द्ध꣢ ऋ꣣तं꣢꣫ कद꣣मृ꣢तं꣣ का꣢ प्र꣣त्ना꣢ व꣣ आ꣡हु꣢तिः ॥३६८॥

अ꣣मी꣡इति꣢ । ये दे꣣वाः । स्थ꣡न꣢꣯ । स्थ । न꣣ । म꣡ध्ये꣢꣯ । आ । रो꣣चने꣢ । दि꣣वः꣢ । कत् । वः꣣ । ऋत꣢म् । कत् । अ꣣मृ꣡त꣢म् । अ꣣ । मृ꣡त꣢꣯म् । का꣢ । प्र꣣त्ना꣢ । वः꣢ । आ꣡हु꣢꣯तिः । आ । हु꣣तिः ॥३६८॥

Mantra without Swara
अमी ये देवा स्थन मध्य आ रोचने दिवः । कद्ध ऋतं कदमृतं का प्रत्ना व आहुतिः ॥

अमीइति । ये देवाः । स्थन । स्थ । न । मध्ये । आ । रोचने । दिवः । कत् । वः । ऋतम् । कत् । अमृतम् । अ । मृतम् । का । प्रत्ना । वः । आहुतिः । आ । हुतिः ॥३६८॥

Samveda - Mantra Number : 368
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 4; Ardh Prapathak » 2; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 2;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
येथे उत्तर न देता केवळ प्रश्न विचारून जिज्ञासा उत्पन्न केलेली आहे. या प्रश्नांची उत्तरे आपल्या प्रतिभेने स्वत: द्या. या प्रश्नांची उत्तरे ही असू शकतात. मस्तकात जे ज्ञानेंद्रियरूपी देव स्थित आहेत त्यांचे ऋत हे की जीवात्म्याला सत्य ज्ञान पोचविणे. त्यांचे अमृत आहे वास्तविक इंद्रियतत्त्व, जे देहाबरोबर असलेले गोलक नष्ट झाले तरी मरत नाहीत, तर सूक्ष्म शरीरात विद्यमान असतात. त्यांची सनातन आहुती शरीररक्षारूपी यज्ञात व ज्ञानप्रदानरूपी यज्ञात आपला होम करणे. याचप्रकारे सूर्यामध्ये द्युलोकस्थ सूर्यात जे किरणरूपी देव स्थित आहेत, त्यांचे ऋत आहे सत्यनियम ज्यानुसार प्रत्येक दिवशी सूर्योदयाबरोबर ते आकाश व भूमंडलात व्याप्त होतात, त्यांचे अमृत आहे. शुद्ध मेघजल ज्याला ते समुद्र इत्यादीद्वारे वाफ बनवून वर घेऊन जातात. त्यांची सनातन आहुती आहे मेघजलाचे पार्थिव अग्नीत होम करणे. ज्याद्वारे पृथ्वीवर औषधी, वनस्पती इत्यादी उगवतात व प्राणी जीवन धारण करतात किंवा सर्व ग्रहोपग्रहात आपला होम करणे, ज्यामुळे पृथ्वी, मंगळ, बुध, चंद्र इत्यादी प्रकाशित होतात. याच प्रकारे राष्ट्रात विद्या दानात जे विद्वान विद्यादानात रमलेले असतात त्यांचे अमृत आहे ज्ञान जे ते सत्पात्रांना देतात. त्यांची सनातन आहुती आहे अध्ययन-अध्यापनरूपी यज्ञात आपला होम करणे इत्यादी, सुज्ञ जनांनी स्वत: परीक्षण केले पाहिजे ॥९॥
Footnote
विवरणकार माधवने हे पाहून या ऋचाचा ऋषी आप्तचा पुत्र त्रित आहे व देवता ‘विश्वेदेवा:’ आहे. यावर निम्नलिखित इतिहास लिहिलेला आहे. आप्त ऋषींचे तीन पुत्र होते - एकत, द्वित, त्रित. त्यांनी यज्ञ करण्याच्या इच्छेने यजमानांकडून गाई मागून घेतल्या. त्यांना ते घरी घेऊन गेले. जेव्हा ते सरस्वती नदीच्या किनाऱ्याने जात होते तेव्हा पलीकडे वसलेल्या गवादकाने त्यांना पाहिले. तो उठला व सरस्वतीचे जल पार करून रात्री त्याने त्यांना घाबरून टाकले, जेव्हा ते भिऊन पळाले तेव्हा त्यातून त्रित गवतांनी व वेलींनी झाकलेल्या एका निर्जल विहिरीत पडला. विहिरीत पडल्यामुळे एकत व द्वितला कमी गाई मिळाल्या असे काही लोक म्हणतात. त्रितला अधिक गाई मिळाल्यामुळे त्यांनी त्रितला विहिरीत ढकलून दिले. तेथे त्याच्या मनात विचार आला की मी यज्ञाचा संकल्प केला होता. जर यज्ञ न करता मृत्यू आला तर माझे कल्याण होणार नाही. यावर असा एखादा उपाय शोधला पाहिजे की मी विहिरीत पडल्या पडल्या सोमपान करू. तो हा विचार करतानाच अचानक एक वेल विहिरीत उतरताना त्याने पाहिली व सोमच आहे, असा निश्चय करून लहान लहान दगडांचा खलवत्त्यासारखा उपयोग करून त्या लतेला अभिषुत करून देवांना आमंत्रित केले तेव्हा देवांना त्याचे कारण समजले नाही, तेव्हा तो दु:खी झाला. बृहस्पतीनेही हाक ऐकली व त्याने देवाला म्हटले की त्रितचा यज्ञ आहे, तेथे जाऊ या. तेव्हा ते सर्व देव तेथे आले. त्यांना पाहून विहिरीत असलेल्या त्रितने त्यांची स्तुती केली व त्यांना व्यंग्यात्मक म्हटले की तुमचा सत्यासत्याचा विवेक नष्ट झालेला आहे. तुम्ही अकृतज्ञ अर्थात् कृतघ्न आहात. मला या विहिरीतून बाहेर काढत नाहीत. त्रितचे व्यंग्यच या ऋचेत प्रकट केलेले आहे, इत्यादी. हा सर्व कल्पनेचा विलास आहे. यात वास्तविकता मुळीच नाही. सुज्ञ लोकांनी हे समजावे.