Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 33

1875 Mantra
Devata- अग्निः Rishi- सिन्धुद्वीप आम्बरीषः, त्रित आप्त्यो वा Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
शं꣡ नो꣢ दे꣣वी꣢र꣣भि꣡ष्ट꣢ये꣣ शं꣡ नो꣢ भवन्तु पी꣣त꣡ये꣢ । शं꣢꣫ योर꣣भि꣡ स्र꣢वन्तु नः ॥३३॥

श꣢म् । नः꣢ । देवीः꣢ । अ꣣भि꣡ष्ट꣢ये । शम् । नः꣣ । भवन्तु । पीत꣡ये꣢ । शम् । योः । अ꣣भि꣢ । स्र꣣वन्तु । नः ॥३३॥

Mantra without Swara
शं नो देवीरभिष्टये शं नो भवन्तु पीतये । शं योरभि स्रवन्तु नः ॥

शम् । नः । देवीः । अभिष्टये । शम् । नः । भवन्तु । पीतये । शम् । योः । अभि । स्रवन्तु । नः ॥३३॥

Samveda - Mantra Number : 33
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 3;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
अभिष्टि व पीति शब्दांनी क्रमश: योग व क्षेम यांचे ग्रहण होते. अप्राप्ताच्या प्राप्तीला अभिष्टि किंवा योग म्हणतात व प्राप्त असलेल्याचे रक्षण करणे याला पीति किंवा क्षेम म्हणतात. परमेश्वराच्या दिव्य शक्तींनी आम्हाला योगक्षेम प्रदान करावे, हा अभिप्राय आहे. ज्या आपदांमुळे ग्रस्त होऊन आम्ही पीडित होतो व ज्या अनागत आपदांच्या भयाने संत्रस्त होतो, त्यांनी आम्हाला घेरावे असे होता कामा नये. त्या सर्व आपत्ती परमेश्वराच्या दिव्य शक्तींच्या प्रभावाने व आमच्या पुरुषार्थाने दूर व्हाव्यात ॥१३॥