Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 193

1875 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वत्सः काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
त्वा꣡व꣢तः पुरूवसो व꣣य꣡मि꣢न्द्र प्रणेतः । स्म꣡सि꣢ स्थातर्हरीणाम् ॥१९३॥

त्वा꣡व꣢꣯तः । पु꣣रूवसो । पुरु । वसो । वय꣣म् । इ꣣न्द्र । प्रणेतः । प्र । नेतरि꣡ति । स्म꣡सि꣢꣯ । स्था꣣तः । हरीणाम् ॥१९३॥

Mantra without Swara
त्वावतः पुरूवसो वयमिन्द्र प्रणेतः । स्मसि स्थातर्हरीणाम् ॥

त्वावतः । पुरूवसो । पुरु । वसो । वयम् । इन्द्र । प्रणेतः । प्र । नेतरिति । स्मसि । स्थातः । हरीणाम् ॥१९३॥

Samveda - Mantra Number : 193
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 2; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 8;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
संसारात पसरलेल्या सर्व धनांचा स्वामी, सर्वांचा नेता, सूर्य इत्यादी लोकांचा अधिष्ठाता, अनुपम परमेश्वर जसा सर्वांना सर्वांना वंदनीय आहे, तसेच अत्यंत ज्ञान, कर्म इत्यादी धनांचा स्वामी, मार्गदर्शक, ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये व प्राण, मन, बुद्धी इत्यादींचा अधिष्ठाता जीवात्माही ग्रहण करण्यायोग्य आहे. त्याचप्रकारे विमान इत्यादी निर्माण करण्यात, चालविण्यात कुशल, विविध विद्यात पारंगत, शिल्पशास्त्राचा वेत्ता विद्वानही माणसांनी ग्रहण करावा ॥९॥
Footnote
या दशतिमध्ये इंद्राद्वारे संबंधित वरुण, मित्र व अर्यमाच्या रक्षणाची प्रार्थना असल्यामुळे, इंद्राच्या गाईंची प्रशंसा असल्यामुळे इंद्राला गाय, अश्व इत्यादींची याचना असल्यामुळे, इंद्राचे सरस्वतीला आवाहन असल्यामुळे, इंद्राचे स्तुतिगान असल्यामुळे व इंद्र नावाने राजा, विद्वान, आचार्य इत्यादीचा विषय वर्णित असल्यामुळे या दशतिच्या विषयाची पूर्व दशतिच्या विषयाबरोबर संगती आहे.