Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 142

1875 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- प्रगाथः काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
क्वा꣢३꣱स्य꣡ वृ꣢ष꣣भो꣡ युवा꣢꣯ तुवि꣣ग्री꣢वो꣣ अ꣡ना꣢नतः । ब्र꣣ह्मा꣡ कस्तꣳ स꣢꣯पर्यति ॥१४२॥

क्व꣢꣯ । स्यः । वृ꣣षभः꣢ । यु꣡वा꣢꣯ । तु꣣विग्री꣡वः꣢ । तु꣣वि । ग्री꣡वः꣢꣯ । अ꣡ना꣢꣯नतः । अन् । आ꣣नतः । ब्रह्मा꣢ । कः । तम् । स꣣पर्यति ॥१४२॥

Mantra without Swara
क्वा३स्य वृषभो युवा तुविग्रीवो अनानतः । ब्रह्मा कस्तꣳ सपर्यति ॥

क्व । स्यः । वृषभः । युवा । तुविग्रीवः । तुवि । ग्रीवः । अनानतः । अन् । आनतः । ब्रह्मा । कः । तम् । सपर्यति ॥१४२॥

Samveda - Mantra Number : 142
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 3;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
तुम्ही म्हणता की ब्रह्मांडाचा कुणी शासक आहे, जो मेघाप्रमाणे सर्वांवर सुखाचा वर्षाव करतो, जो कधी बालक नसतो, कधी वृद्ध होत नाही तर सदैव तरुण असतो. जो हजारो ग्रीवायुक्त बनून प्रलय काळात सर्व पदार्थांना गिळून टाकतो व सृष्टीकाळात हजारो लोकांना ज्ञानाचा उपदेश करतो, जो कधी शत्रूंसमोर झुकत नाही, तर त्यांनाच झुकवितो. आम्ही विचारतो तो कुठे आहे? जर आहे तर दाखवा. तुम्ही म्हणता, की तो पूजनीय आहे. आम्ही विचारतो, की कोण विद्वान आहे, जो त्या निराकार, अशरीरी, अदृश्य, अश्रव्याची पूजा करू शकेल? त्यासाठी तो नाहीच, त्याची कोण पूजा करू शकेल? हा प्रश्नकर्त्याचा अभिप्राय आहे. ॥८॥