Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 127

1875 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- भारद्वाजः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
य꣡ आन꣢꣯यत्परा꣣व꣢तः꣢ सु꣡नी꣢ती तु꣣र्व꣢शं꣣ य꣡दु꣢म् । इ꣢न्द्रः꣣ स꣢ नो꣣ यु꣢वा꣣ स꣡खा꣢ ॥१२७॥

यः꣢ । आ꣡न꣢꣯यत् । आ꣣ । अ꣡न꣢꣯यत् । प꣣राव꣡तः꣢ । सु꣡नी꣢꣯ती । सु । नी꣣ति । तुर्व꣡श꣢म् । य꣡दु꣢꣯म् । इ꣡न्द्रः꣢꣯ । सः । नः꣣ । यु꣡वा꣢꣯ । स꣡खा꣢꣯ । स । खा꣣ ॥१२७॥

Mantra without Swara
य आनयत्परावतः सुनीती तुर्वशं यदुम् । इन्द्रः स नो युवा सखा ॥

यः । आनयत् । आ । अनयत् । परावतः । सुनीती । सु । नीति । तुर्वशम् । यदुम् । इन्द्रः । सः । नः । युवा । सखा । स । खा ॥१२७॥

Samveda - Mantra Number : 127
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 2;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
जसे विमान इत्यादी यानांमध्ये प्रयुक्त विद्युद्रुप अग्नी दूर दूर प्रदेशातही विमानचालकांच्या इच्छानुकूल गतीने लोकांना देशांतरी पोचवितो किंवा जसा सुयोग्य राजा अधर्म मार्गावर चालणाऱ्या लोकांना त्यापासून दूर करून धर्ममार्गात प्रवृत्त करतो तसेच परमेश्वर, उन्नतीसाठी प्रयत्न करणाऱ्या पण कधी कधी कुसंगात पडणाऱ्या व सन्मार्गापासून दूर जाणाऱ्या माणसांवरही कृपा करतो व आपल्या जवळ आणून धार्मिक बनवितो ॥३॥
Footnote
या मंत्राच्या व्याख्येत विवरणकाराने लिहिले आहे, की तुर्वश व यदु नावाचे राजपुत्र होते. याचप्रकारे भरत स्वामी व सायणचे कथन आहे - तुर्वश व यदु नावाचे दोन राजे होते, ज्यांना शत्रूने दूर नेऊन सोडले होते. त्यांना इंद्राने उत्तम नीतीने दूर देशाहून आणले होते. हा त्या सर्वांचा अभिप्राय आहे. हा सर्व प्रलाप आहे, कारण वेद सृष्टीच्या आरंभी परब्रह्म परमेश्वराकडून प्राप्त झाले होते, त्यामुळे त्यात नंतरच्या कोणत्याही राजाचा इतिहास असू शकत नाही. त्याबरोबरच वैदिक कोष निघण्टुमध्ये ‘तुर्वश’ मनुष्यवाची व समीपवाची शब्दात पठित आहे व ‘यदु’ही मनुष्यवाची शब्दात पठित आहे. त्यामुळेही त्यांना ऐतिहासिक राजा मानणे योग्य नाही. ॥१२७॥