Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

Samveda Mantra 119

1875 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- श्रुतकक्षः आङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
त꣡मिन्द्रं꣢꣯ वाजयामसि म꣣हे꣢ वृ꣣त्रा꣢य꣣ ह꣡न्त꣢वे । स꣡ वृषा꣢꣯ वृष꣣भो꣡ भु꣢वत् ॥११९॥

त꣢म् । इ꣡न्द्र꣢꣯म् । वा꣣जयामसि । महे꣢ । वृ꣣त्रा꣡य꣢ । ह꣡न्त꣢꣯वे । सः । वृ꣡षा꣢꣯ । वृ꣣षभः꣢ । भु꣣वत् ॥११९॥

Mantra without Swara
तमिन्द्रं वाजयामसि महे वृत्राय हन्तवे । स वृषा वृषभो भुवत् ॥

तम् । इन्द्रम् । वाजयामसि । महे । वृत्राय । हन्तवे । सः । वृषा । वृषभः । भुवत् ॥११९॥

Samveda - Mantra Number : 119
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 1;

Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi)

मराठी
Samveda Marathi Bhashy (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
अनावृष्टीच्या दिवसात मेघ जसा सूर्याच्या प्रकाशाला व जल खाली येण्यास रोखून भूमीवर अंधकार व अवर्षण उत्पन्न करतो, तसेच पापविचार व पापकर्म भूमंडळावर पसरून सत्याच्या प्रकाशाला व धर्मरूप स्वच्छ जलाला रोखून असत्याचा अंधकार व अधर्मरूप अवर्षण उत्पन्न करतात. इंद्र नावाचा परमेश्वर जसे मेघरूप वृत्राला मारून सूर्याच्या प्रकाशाला व वर्षा जलाला निर्बाध भूमीवर प्रवाहित करते, तसेच पापरूप वृत्राचा विनाश करून संसारात सत्याच्या प्रकाशाला व धर्माच्या वृष्टिजलाला मुक्त हस्ताने प्रवाहित करावे. ज्यामुळे सर्व भूमंडळ निवासी लोक सत्य ज्ञान व सत्याचरणात तत्पर व धार्मिक बनून अत्यंत सुखी व्हावेत. याचप्रकारे राष्ट्रात राजाचेही कर्तव्य आहे, की दुष्ट शत्रूंना नष्ट करून सुखी करावे. ॥५॥